Home / Uncategorized / आमरस,भजे,कुरडाया व मांड्याच्या महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…!

आमरस,भजे,कुरडाया व मांड्याच्या महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…!

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

 

सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे 3 एप्रिल पासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी हभप गुरुवर्य विष्णु महाराज केंद्रे आळंदीकर यांच्या काल्याचे किर्तन आणि पाच क्विंटल आंब्याचा आमरस, भजी, कुरडाया, पापड, व मांड्याच्या महाप्रसादाने मोठ्या उत्साहात झाली. यावेळी जवळपास हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. . मागील वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी गुरुवर्य हभप विष्णु महाराज केंद्रे आळंदीकर यांनी आपल्या आपल्या काल्याच्या कीर्तनातून खुल्लोड येथील ग्रामस्थांना पुढच्या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद हा मांड्याचा व आमरसाचा असेल असा शब्द दिला होता. त्यांच्या आश्वासनाची पूर्तता आज खुल्लोड येथील गावकऱ्यांनी पूर्ण केली. यंदा सप्ताहाचे 34 वर्ष असतानाही येथील ग्रामस्थांनी सात दिवस सप्ताहाची मोठ्या उत्साहात जय्यत तयारी केली होती. सायंकाळी दररोज संपूर्ण गावकऱ्यांना गावपंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात हभप सोपान महाराज गोळेसर सिन्नर, हभप नागेश महाराज कदम उंडणगाव, हभप सुखदेव महाराज शनेश्वर संस्थान नेवपूर, हभप मधुकर महाराज पारनेरकर भवन, हभप नारायण महाराज शास्त्री उमरत, हभप गहिनीनाथ महाराज शास्त्री भगवानगड, अहिल्यानगर, हभप चांगदेव महाराज काकडे कंडारी, या नामवंत महाराजांची कीर्तने झाली. तसेच शुक्रवारी गुरुवर्य हभप विष्णु महाराज केंद्रे आळंदीकर यांच्या काल्याचे किर्तन आणि या सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना साधू संतांची सेवा करून, दानधर्म करा व आई-वडिलांची सेवा करुन आध्यात्मिक मार्गाने जीवन जगा जीवनात कधीच अपयश येणार नाही असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना दिला. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी या सप्ताहाच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुल्लोड येथील ग्रामस्थ व महिला , व तरुण वर्गांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार