Home / Uncategorized / देव्हारी येथे ‘शिव समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांना विविध योजनांची माहिती…!

देव्हारी येथे ‘शिव समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांना विविध योजनांची माहिती…!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

महसूल विभागाच्या पुढाकारातून सावळदबारा मंडळात शिबिर; अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा मंडळ अंतर्गत देव्हारी येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान दि. १० एप्रिल २०२६ रोजी उत्साहात पार पडले. सर्वप्रथम संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार मनीषा मेने व सभापती उत्तम चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.राज्याचे महसूल मंत्री मा. नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच महसूल, भूमिअभिलेख व इतर विभागांशी संबंधित अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास तहसीलदार सौ. मनीषा मेने, गट विकास अधिकारी श्री. शिवाजी येंबुलवार (पंचायत समिती सोयगाव), पंचायत समिती सभापती श्री. उत्तम महारु चव्हाण, पुरवठा अधिकारी काकासाहेब सावळे,नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच तेजराव जाधव, करतार चव्हाण, गजानन चव्हाण, मोहन चव्हाण, वरदानसिंग चव्हाण, शिवा आप्पा चोपडे, भागवत जाधव, मो. आरिफ मो. लुखमान, पोलिस पाटील विलास कुल्ले, तालुका कृषी अधिकारी भारत कासार, डॉ. शिंदे, प्राचार्य एन.आर. कोलते पाटील तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

गजानन महाराज मंदिर सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आयोजित या शिबिरात भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिकांना महसूल, कृषी व पंचायत राज विभागांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सभापती उत्तम चव्हाण यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. गायरान जमिनींची मोजणी करून मालकी हक्क देणे, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे, बीपीएल कुटुंबांना पीएचएच योजनेत समाविष्ट करणे, तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच पांदण रस्त्यांच्या समस्यांवर उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तहसीलदार मनीषा मेने यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी सिताराम जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी अरुण पंडित तसेच ग्राम महसूल अधिकारी तुषार नागपुरे, आकाश पिराने, वैभव जाधव, भगवान सोळंके, शंकर काळे, अनंता गायकवाड, सुनील माकोडे, सुभाष राठोड, विनोद चव्हाण,दाराभाऊ चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

कार्यक्रमाच्या शेवटी देव्हारी मंडळातील सर्व नागरिकांचे सरपंच तेजराव जाधव यांनी आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार