छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
“व्यसनमुक्त युवक हीच विकसित भारताची खरी ताकद युवकांनी नशेच्या आहारी नजता निरोगी आयुष्य जगावे – शि.आ) विठ्ठल भुसारे”
वाशिम दि. २८ : माय भारत, वाशिम (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धांमध्ये लोकगीत (सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म/रिल, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर आधारित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी आपली सादरीकरणे मोठ्या उत्साहामध्ये पारंपारिक वेशभूषा कला आणि भूमिका साकारून सादर केले. या स्पर्धांचे आयोजन दि. २८ जुलै २०२६ रोजी राजस्थान महाविद्यालय, वाशिम येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी महोदय यांच्या प्रतिनिधी विठ्ठल भुसारे शिक्षण अधिकारी (प्रा), कैलास घुमरे सेवानृत्य अधिकारी, प्रा.डॉ.ओमप्रकाश झवंर प्राचार्य राजस्थान महाविद्यालय, शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मयूरकुमार गोमरे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत केंद्र वाशिम, प्रा. डॉ. किशोर एम. इंगोले पसहप्रचार्य श्री शिवाजी महा. हिंगोली, कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे माय भारत केंद्र वाशिम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी
यावेळी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी तथा शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत” या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता निरोगी, सुदृढ व संस्कारक्षम जीवन जगावे, आपल्या कुटुंबासह समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे मोलाचे आवाहन त्यांनी केले. तसेच व्यसनमुक्त युवक हीच विकसित भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.या वेळी जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी संघ व स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली.पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था, केकतउमरा, द्वितीय क्रमांक बाकलीवाल विद्यालय, वाशिम (NCC पथक) तर तृतीय क्रमांक विष्णू वानखेडे (ब्राह्मणवाडा) यांनी पटकाविला. समूह लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, केकतउमरा, द्वितीय क्रमांक विद्याताई भगत व संच, वाशिम, तर तृतीय क्रमांक राजस्थान महाविद्यालय, वाशिम यांनी मिळविला.
समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक राजस्थान महाविद्यालय, वाशिम, द्वितीय क्रमांक राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था, केकतउमरा, तर तृतीय क्रमांक बाकलीवाल विद्यालय, वाशिम (NCC पथक) यांनी पटकाविला.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका दीपक दंडे, द्वितीय क्रमांक शामल पंढरी देवळे, तर तृतीय क्रमांक ऋषिकेश विष्णू चौधरी यांनी मिळविला.
कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका दंडे, द्वितीय क्रमांक प्रणव खडसे, तर तृतीय क्रमांक वैष्णवी पानझाडे यांनी यश संपादन केले.चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्बन निरंजन सांगते, द्वितीय क्रमांक अनुजा सखाराम काकडे, तर तृतीय क्रमांक सेजल विठ्ठल सरनाईक यांनी मिळविला.
घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभांगी रामदास काकडे, द्वितीय क्रमांक अनुजा सखाराम काकडे, तर तृतीय क्रमांक गंगोत्री सुनील इंगळे यांनी पटकाविला.
रिल्स व लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रदीप कडूजी पट्टेबहादूर, द्वितीय क्रमांक विष्णू जाधव, तर तृतीय क्रमांक वैशाली जाधव यांनी मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले प्रथम द्वितीय विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तरावरती संधी मिळाल्या असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रस्तावित मयूर कुमार घुमरे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार अनिल ढेंगे यांनी मानले,यशस्वी करण्याकरिता मेरा युवा भारत केंद्राचे मा. स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर, निलेश खोरणे, राजस्थानी हा विद्यालयाचे प्रा.डॉ. विजय जाधव, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ व राजा प्रसेनजित संस्था केकतउमरा यांनी परिश्रम घेतले.






