लोक महाराष्ट्र न्यूज हेड : उमा जैवाळ
आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी चिखली येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जाऊन “गोमाता सन्मान अभियान” अंतर्गत जनजागृती करण्यात आली.
या निमित्ताने सौ. नीताताई जैन, सौ. उमाताई जैवाळ आणि सौ. छायाताई खरात यांनी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले.
गोमातेला “राष्ट्रमाता” दर्जा मिळावा, तसेच भारतीय संस्कृतीत असलेले तिचे स्थान आणि महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही या विषयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज असून, या अभियानाद्वारे व्यापक स्तरावर जनसंपर्क साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
🚩 जय श्रीराम
🚩 जय गोमाता






