Home / Uncategorized / मनातली भीती काढण्यासाठी देऊळगावात भरली सापांची शाळा…

मनातली भीती काढण्यासाठी देऊळगावात भरली सापांची शाळा…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  :  गोकुळसिंग राजपूत 

“भिऊ नकोस बाळा आज भरली आहे सापांची शाळा”

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे दि.६/४/२६ रोजी ठीक सकाळी 9:00 वा. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,देऊळगाव येथे सर्पदंश प्रथमोपचार व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.विरभद्र समशेट्टे यांनी भूषविले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.जगतसिंग परिहार,श्री.खय्युमखान पठाण, सर्पमित्र विजय आप्पा जटाळे, प्रदीप शेळके

राजेश सोनवणे,अशोक खामकर

ज्ञानेश्वर ठाकरे,विनोद खोडपे यांच्या उपस्थितीत सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना सापांचे विविध प्रकार, सापांविषयी समाज व गैरसमज, अंधश्रद्धा, सर्पदंशानंतर करावयाचे प्रथमोपचार याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी सर्पमित्रांना सापांविषयी अनेक प्रश्न विचारले व सर्पमित्रांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.गावातील तरुणांना सर्पमित्र बनण्याचे अवाहन केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. अश्विनी कांबळे यांनी केले.त्यांनी उपस्थित पालक व ग्रामस्थांना आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्याचे आवाहनही केले. राहत तडवी, शाहिस्ता नेक या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास जि.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळा व महाराणा प्रताप विद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी आयोजक शाळेचे शिक्षक व शिक्षिका कोमल इंगळे,वैशाली निसर्गन,सुनिता घंटेवाड, प्रतिक्षा मोघे,गोपाल चौधरी,सुखलाल नाईक यांनी सहकार्य केले.अशी माहिती पत्रकार संजय जटाळे यांनी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार