सोयगाव (प्रतिनिधी) गोकुळ सिंग राजपूत
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या उपस्थितीत विचारमंथनाला वेग
सोयगाव मंडळाच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचा पहिला दिवस दि. ४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या उस्फूर्त सहभागात पार पडला. कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एका सत्रात आपण स्वतःचा विषय प्रभावीपणे मांडत कार्यकर्त्यांना प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून संघटनात्मक बळकटी, पक्षाची विचारधारा आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी पंचायत समिती सोयगावचे सभापती श्री. उत्तम चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ, जयप्रकाश चव्हाण, बद्रीभाऊ राठोड, तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, सरपंच वरदानसिंग चव्हाण,पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, गजानन पवार, जिल्हा चिटणीस सुनील गवळे, सुरज कवाल, मोतीलाल वाघ, प्रा. जीवन कोलते पाटील, तालुका सरचिटणीस मनोज शिवाजीराव बुढाळ, समाधान बावस्कर, धनराज भाऊ, फिरोज तडवी, वसंत भाऊ, प्रदीप राठोड, लक्ष्मण राठोड, लोकेश भाऊ, विलास भाऊ, संतोष शिंदे, संजय चौधरी, शांताराम खराटे, पंढरी साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना वैचारिक बळ, संघटन कौशल्य आणि आगामी निवडणुकांसाठी आवश्यक दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला असून पुढील सत्रांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






