Home / Uncategorized / खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर : कामातून ओळख निर्माण करणारे आदरणीय श्री इद्रिस मुलतानी 

खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर : कामातून ओळख निर्माण करणारे आदरणीय श्री इद्रिस मुलतानी 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे झालेल्या सभेमध्ये एका लोकप्रतिनिधींनी आदरणीय श्री इद्रिस मुलतानी साहेब हे “स्थानिक नाहीत” अशा प्रकारचे दिशाभूल करणारे व खोटे भाष्य केले. परंतु सावळदबारा व संपूर्ण सोयगाव तालुक्यातील जनतेला सत्य माहीत आहे. स्थानिक असणे म्हणजे केवळ पत्ता नाही, तर लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि विश्वास निर्माण करणे होय.

आदरणीय श्री इद्रिस मुलतानी साहेब यांनी कधीही खोटे बोलले नाही, फक्त कामातून उत्तर दिले आहे. ते कोणत्याही पदावर नसतानासुद्धा सोयगाव तालुक्यातील असंख्य विकासकामे मार्गी लावली आहेत. गोरगरिबांचे प्रश्न असोत, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत किंवा विद्यार्थ्यांचे भवितव्य—सर्व बाबींमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळेच त्यांची ओळख गल्लीपासून मुंबईपर्यंत निर्माण झाली आहे. असा विश्वास माजी सरपंच भाऊराव कोलते पाटील यांनी व्यक्त केला आहे

दुसरीकडे, याच मतदारसंघात यापूर्वी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावाने काय केले, हा प्रश्न आजही जनतेसमोर उभा आहे.

देऊळगाव ते सावळदबारा रस्ता कित्येक वर्षांपासून खड्डेमय आहे.

चारू गावात पावसाळ्यात पूल नसल्याने आजही संपर्क तुटतो.

सावळदबारा प्रवेशद्वार ते चक्रधर स्वामी मंदिरापर्यंत साधी मोटरसायकल जाणे कठीण आहे.

बस स्टॉपपासून गावात जाण्यासाठी व्यवस्थित रस्त्याची व्यवस्था नाही.

सावळदबारा ते टिटवी व देवारी ते सावळदबारा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

भूमिपूजन झाले, नारळ फुटले, आश्वासने दिली गेली—परंतु प्रत्यक्षात काम मात्र कधीच पूर्ण झाले नाही. निवडणुका आल्या की आश्वासनं, निवडणुका गेल्या की दुर्लक्ष—हा जुना अनुभव जनतेने अनेकदा घेतला आहे.

याउलट, आदरणीय श्री इद्रिस मुलतानी साहेब यांनी न सांगता, न जाहिरात करता अनेक कामे केली आहेत—

✔ शेतकऱ्यांसाठी पोल, डीपी, वीज समस्या

✔ घरकुल, विहीर, गाय गोठा यांसारखी कामे

✔ विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रामाणिक पाठपुरावा

म्हणूनच “मुलतानी साहेब स्थानिक नाहीत” हा आरोप पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे. जे लोकांचे काम करतात, तेच खरे स्थानिक असतात, हे सावळदबारा आणि फरदापूर सर्कलमधील जनतेला चांगलेच माहीत आहे.

त्यामुळे येणाऱ्या ७ फेब्रुवारी रोजी

कमळ या चिन्हावर मतदान करून

फरदापूर जिल्हा परिषद सदस्य उमेदवार कुमारी माहीन इद्रिस मुलतानी,

फरदापूर पंचायत समिती सदस्य उमेदवार श्री राहुल राठोड,

सावळदबारा पंचायत समिती सदस्य उमेदवार श्री उत्तम महारु चव्हाण,

या भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच नम्र विनंती.

जनतेचा कौल हा खोट्या प्रचाराला नाही, तर काम करणाऱ्या नेतृत्वालाच असतो—हा विश्वास आम्हाला आहे.भाऊराव लक्ष्मणराव कोलते

अध्यक्ष, जयकालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था, सावळदबारा

भाजपा जिल्हा संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ, छत्रपती संभाजीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार