Home / Uncategorized / स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

अभिजीत दरेकर यांना द ग्रेट पत्रकारिता आयकॉन पुरस्कार प्रदान  

रायगड;आई फाउंडेशन, रायगड (भारत) व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६” हा भव्य सोहळा शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बीरवाडी येथील हॉटेल फाउंटन इन (लिमोनेट लीला) येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

“कर्तृत्वाचा गौरव… रायगडचा अभिमान!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्जत येथील पत्रकार अभिजित नारायण दरेकर यांना ‘द ग्रेट पत्रकारिता आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला.

अभिजीत दरेकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि धाडसाने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार सन्मान देण्यात आला. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक समस्या आणि जनतेच्या अडचणी प्रभावीपणे मांडत त्यांनी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. विनोदराव मोरे यांनी मार्गदर्शन करताना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना अशा प्रकारच्या व्यासपीठातून प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. रायगडच्या ऐतिहासिक वारशाची परंपरा आणि स्वराज्य मूल्यांची जपणूक करत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा या संमेलनाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सन्मानित व्यक्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अभिजित दरेकर यांना मिळालेला हा सन्मान रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या कार्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.अशी माहिती एन टिव्हीचे पत्रकार जब्बार डी तडवी यांनी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार