Home / Uncategorized / पळसखेडा सोसायटीवर अब्दुल सत्तार गटाचे वर्चस्व कायम; छगन राठोड यांची बँक प्रतिनिधीपदी निवड…

पळसखेडा सोसायटीवर अब्दुल सत्तार गटाचे वर्चस्व कायम; छगन राठोड यांची बँक प्रतिनिधीपदी निवड…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत :

 सहकार क्षेत्रात नवे नेतृत्व उदयास; छगन राठोड यांच्या निवडीने परिसरात आनंदाची लाट; गोपीचंद जाधव 

सोयगाव तालुक्यातील पळसखेडा परिसरातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अब्दुल सत्तार गटाचे वर्चस्व अधोरेखित झाले असून वरखेडी तांडा येथील मा. श्री छगन मोरसिंग राठोड यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधीपदासाठी झालेल्या प्रक्रियेत सभासदांच्या मतदानाद्वारे ही निवड पार पडली. एकूण सात सभासदांनी मतदान करत राठोड यांच्या बाजूने कौल दिला. यामध्ये प्रताप जाधव (चेअरमन), उत्तम चव्हाण, त्र्यंबक जाधव, राणीदास चव्हाण, शेषमल जाधव आणि सौ. सखुबाई राठोड यांचा समावेश होता.

राठोड यांच्या निवडीबद्दल मा. आमदार अब्दुल सत्तार साहेब, संचालक मंडळ, हितचिंतक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील सहकार चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी यांच्या कडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद (गोपीभाऊ) जाधव यांनी छगन राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी राठोड यांनी शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी गोपीभाऊ जाधव, प्रताप जाधव, श्रावण जाधव, रमेश जाधव, आंबदास जाधव, ईश्वर जाधव, विनोद जाधव, संजय चव्हाण (मा. सरपंच), रंजू चव्हाण, मुकेश राठोड, अशोक पाटील, सोना चव्हाण, मिश्रिलाल जाधव, पदम राठोड, अर्जुन चव्हाण यांसह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीमुळे पळसखेडा परिसरातील सहकार क्षेत्रात सत्तार गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार