Home / Uncategorized / सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न…

सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

हिंदू एकजुटीवरच भारताचे भविष्य – आशुतोष झा

सोयगाव (ता. 29 मार्च 2025): सोयगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले. या संमेलनाला संत-महंत, प्रखर हिंदुत्ववादी वक्ते तसेच सोयगाव व परिसरातील हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक हनुमान चालीसा पठण व दीपप्रज्वलन करण्यात आले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या संमेलनात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रनिर्माण यांवर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते आशुतोष झा यांनी “हिंदूंच्या एकजुटीवरच भारताचे भविष्य अवलंबून आहे” असे प्रतिपादन केले. तसेच हिंदूंना जाती-पातीमध्ये विभागण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

संमेलनात पूज्य संत गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद महाराज, गोरक्षनाथ आबुज, सारिका ताई मिसाळ (यशोदा माता), जान्हवीताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी ब्रह्मानंद यांनी सनातन धर्मातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्तंभांचे महत्त्व स्पष्ट केले, तर गोरक्षनाथ आबुज यांनी हे संमेलन समाजातील एकजूट आणि आत्मपरीक्षणासाठी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश जोशी यांनी केले, सूत्रसंचालन हर्षल हिंदू यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधन्वा केणेकर यांनी मानले. शेंदुर्णी बायपास रोडवर आयोजित या संमेलनात विविध गणेश मंडळ, दुर्गा मंडळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण शांततेत पार पडले. या भव्य आयोजनासाठी स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सोयगावच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज एकत्र आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या संमेलनातून समाजात एकात्मता, संस्कार आणि सांस्कृतिक जागृतीचा संदेश दिला गेला. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी घडावी आणि सोयगावचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली अशी माहिती दत्तात्रेय काटाले यांनी बोलताना सांगितले आहे.

कोट,

प्रतिकिऱ्या

 गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद जी महाराज, श्री.गोरक्षनाथ आबूज, आशुतोष झा, साध्वी सारिका ताई वृंदावन .ह

भ.प. सुधन्वा केनेकर महाराज , ह.भ.प. जान्हवी ताई सोनवणेया सर्व संतांचे अमृतवचन आपणा सर्व सोयगाववासी हिंदूंना नक्कीच सदैव दिशा देणारे ठरतील.

कार्यक्रम संपल्यावर सुद्धा अगदी शांततेने फराळ प्रसादाच्या पंगती कोणताही गोधळ न करता झाल्या, सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

विशेष म्हणजे एवढ्या भव्य हिंदू संमेलननातून श्री संत रामकृष्ण दादा नाईक गुरुजी यांचे सोयगावकर भाविकांवर असलेले संस्कार स्पष्ट दिसले व त्या गोष्टीचे कौतुक स्वतः आशुतोष झा यांनीही केले आणि याचा उल्लेख आपल्या आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आभार मानताना केला. व समर्पण फाउंडेशन यांचे सदस्य व हर्षल हिंदू फुसे त्यांचे परिश्रम व तत्परता त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होणार.

असेच संस्कार संस्कृतीची शिकवण देणारे कार्यक्रम आपल्या सोयगाव नगरी मध्ये सतत होत राहून नवीन पिढीही घडत राहो व आपल्या गावाचे नाव रोशन होत राहो हीच सदिच्छा.

परत एकदा सकल हिंदु समाज व समितीचे कोटी कोटी आभार.

कृषीभूषण अरूण श्रीराम सोहणी

फोटो दत्तात्रय काटोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार