Home / Uncategorized / ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्यासाठी महावितरणची मोहीम तीव्र…

३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्यासाठी महावितरणची मोहीम तीव्र…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

सावळदबारा परिसरात वीज बिल वसुलीला वेग; ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांची माहिती 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, सोमनाथ घुले, सहायक अभियंता अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्राहकांनी थकबाकी भरण्यास पुढाकार घेतला आहे. आर्थिक वर्ष समाप्तीची अंतिम तारीख ३१ मार्च जवळ आल्याने महावितरण प्रशासनाने वसुली मोहिमेला गती दिली आहे.

सावळदबारा येथील महावितरण कार्यालयाअंतर्गत डाभा, देव्हारी, पिंपळवाडी, महाल्बदा, घाणेगाव, तांडा नांदा, मोलखेडा, हिवरी, चारु तांडा, टिटवी, पळसखेडा, नादांगाव आदी सुमारे बारा ते तेरा गावांचा समावेश असून या सर्व गावांमध्ये वीज बिल वसुलीचे काम वेगाने सुरू आहे.

कार्यकारी अभियंता अविनाश राऊत व सहाय्यक अभियंता सोमनाथ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घरोघरी जाऊन ग्राहकांना बिलाची माहिती देत आहेत. तसेच थकीत बिल भरण्यासाठी जनजागृती करून तत्काळ वसुली करण्यात येत आहे. काही ग्राहकांच्या बिलांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांची तत्काळ दुरुस्ती करून दिली जात असल्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढत आहे.

या मोहिमेत सहायक अभियंता अविनाश पाटील,मंगेश धनोकर,निम्नस्तर लिपिक सचिन आगलावे, ज्ञानेश्वर घोडके, वैभव ठाकूर, गणेश काकडे,भगतसिंग परदेशी , सुशील लांडगे,फाल्गुन मोरे, आदी कर्मचारी सक्रियपणे सहभाग घेत असून त्यांनी वसुली प्रक्रियेला गती दिली आहे.म्हणून सावळदबारा परिसरात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याबाबत माहिती देताना टेक्निकल ऑपरेटर मंगेश धनोकार यांनी सांगितले की, “ग्राहकांकडून बिल भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत असून अंतिम तारखेपूर्वी जास्तीत जास्त वसुली पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच नागरिकांनी वेळेत बिल भरून सहकार्य करावे,” असे आवाहनही महावितरण कंपनीच्या वतीने सहायक अभियंता सोमनाथ घुले यांनी केले आहे

महावितरणच्या या उपक्रमामुळे सावळदबारा परिसरातील वीज बिल वसुलीत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार