संभाजीनगर/(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)
विषेश आकर्षन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल राठोड महाराज यांचे माणुसकी या विषयावर व्याख्यान,ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने यांचे खळखळून हसवणारे मुख अभिनय
महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी वृद्ध सेवालय संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या वर्धापन दिनानिमित्त्याने सेवा गौरव पुरस्कार सोहळा व ची.राम सुमित पंडित यांच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यासाठी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ नामवंत आदर्श व्यक्तींची सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड समीती तर्फे निवड करण्यात आली आहे.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
राजेंद्र हिवाळे साहेब प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास
विभाग ठाणे,रविंद्र जोगदंड साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीनगर,संजय सोनायब तहसीलदार,गेवराई,आप्पासाहेब उगले सचिव/परियोजना संचालक,
मराठी ग्रामिण विकास संस्था,
पंकजपाल राठोड महाराज (सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य), मुकुंद विश्वनाथ सोनवणे सामाजिक विषयाचे अभ्यासक व भाष्यकार,
सचिन कुंभार वरिष्ठ पोलीस निरिक्षक,स्वाती केदार पोलीस निरिक्षक,सम्राटसिंह राजपूत वरिष्ठ पोलीस निरिक्षक,अमोल सातोडकर सहायक पोलीस निरिक्षक,सुनिल इंगळे सहाय्यक पोलीस निरिक्षक,
भगतसिंह दरक संचालक हायफिल्ड एजी-केम प्रा.लि. मीराबाई देविदास पंडित,
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केद्र टि.व्ही सेंटर संभाजीनगर येथे मंगळवार दि. ३१-०३-२०२६.-रोजी सकाळी ११:३० ते ०२:०० पर्यत रक्तदान शिबीराने सुरवात होइल.दुपारी ०२:०० वा.मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरवात होणार आहे,
माणुसकी समुहाच्या वतीने शासकीय रुग्णालयात गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात येणार आहे.तसेच संभाजीनगर शहरातील दानशुर रक्त दात्यांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करावे असे आव्हान माणुसकी समुहातर्फे समाजसेवक सुमित पंडित यांनी केले आहे.






