चिखली | मेघा जाधव
चिखली : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज चिखली येथे सर्व शिक्षक व कर्मचारी हया हुतात्मा दिनी सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.






