छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार
कामदा एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क आरोग्य सेवा शिबिरास शेकडो वारकरी व पंचक्रोशीतील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात सुमारे 250 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला या आरोग्य शिबिरात.
*रोग निदान
*नाडी परीक्षण
*शास्त्रोक्त आयुर्वेद चिकित्सा
*औषधांचे मोफत वितरण
*आहार व योग मार्गदर्शन
यांचा समावेश होता.
हे शिबिर श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर आणि श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
हे शिबिर दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला, पैठण येथील आनंदभुवन, श्री देवनाथ महाराज मंदिर व नाथ मंदिर येथे नियमितपणे आयोजित करण्यात येते.
या उपक्रमामध्ये महाराष्ट्रभरातील अनुभवी आयुर्वेदिक वैद्य स्वेच्छेने सहभागी होतात. यामध्ये वैद्य. देवेंद्र बुणगे, वैद्य अविनाश भारती, वैद्य गोपाल गायकवाड, वैद्य मीनाक्षी बुणगे, वैद्य दिव्या गायकवाड, वैद्य पूनम बोरसे, वैद्य सृष्टी जाधव, वैद्य वैष्णवी गौरशेट्टी, वैद्य सावनी सुतार, वैद्य ऋतुजा पानसरे, वैद्य दीप्ती गोरे, वैद्य चिन्मय चौधरी, वैद्य शीतल जाधव इत्यादी डॉक्टरांनी सेवा दिली. समाजाभिमुख आणि आध्यात्मिक सेवेसाठी हे शिबिर महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध ठिकाणी आयोजित केले जाते. त्यामध्ये
पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, नरसिंहवाडी, मुक्ताईनगर, आळंदी, बार्शी, सांगवडे, मुंबई, परडसिंगा, कशेळे, नर्सिनामदेव यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती शिबिर प्रमुख वैद्य. देवेंद्र बुणगे यांनी दिली.
या सेवाकार्यात सहभागी सर्व आयुर्वेद चिकित्सक, सेवाभावी कार्यकर्ते यांचे उपस्थितांनी मनःपूर्वक कौतुक केले. घडलेली ही सेवा शिबिरा अंती पसायदान घेऊन श्री सद्गुरु चरणी अर्पण करण्यात आली, .






