Home / Uncategorized / अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 पुणे या ठिकाणी संपन्न…

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 पुणे या ठिकाणी संपन्न…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पुणे येथे कार्यक्रमाचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व तसेच दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा होते. प्रमुख मान्यवर सौ सुनिता ताई काळे, सौ सुजाता किरण माने, सौ अलकाताई , सौ तेजश्री ताई सचिन बदक नगरसेविका या सर्व मान्यवर उपस्थित होते. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या माता भगिनींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आली. तसेच वीर माता वीर पत्नी या माता भगिनींचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आली. यावेळी सौ अलकाताई, सौ सुजाता ताई, सौ सुनिता ताई या मान्यवरांचा मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी सर्व माता-भगिनींना उद्देशून मनोगत व्यक्त केले. आपला एकमेव संघटना महिला जागतिक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये माता भगिनींच्या सत्कार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाचा निमंत्रण दिले व तसेच दरवर्षीप्रमाणे आपण जागतिक महिला दिन प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते तसेच पुढेही करत राहणार आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करून दाखविल्या त्याबद्दल सर्वांचे मन भरून कौतुक केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन खंडागळे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बोराडे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष योगेश भोसले पुणे शहर उपाध्यक्ष राहुल सकट पुणे शहर कार्याध्यक्ष नेताजी पवार पुणे जिल्हा संघटक महेश शर्मा, पुणे जिल्हा संघटक मुनाफ पटेल, शिरूर तालुका उपाध्यक्ष साजिद शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सागर घाईतडक, पुणे शहर कामगार अध्यक्ष अविनाश क्षीरसागर, पुणे शहर मीडिया सेल विभाग उपाध्यक्ष नामदेव केदारी, धनंजय साळवी. पिंपरी चिंचवड अध्यक्ष पुष्पाताई थोरात. शिरूर तालुका महिला उपाध्यक्ष सविताताई करंजुले पुणे शहर वाहतूक विभाग अध्यक्ष सचिन साठे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष योगेश कांबळे,या सर्व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्राजक्ताताई दिसले यांनी केले. कार्यक्रमाच्या आभार जयश्रीताई पाटील यांनी करून कार्यक्रम संपन्न करण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार