चिखली : उमा जैवाळ
चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा महाधडाका; ३५–४० गावांतील विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड तसेच बुलढाणा नगरपालिका गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात जाहीर पक्षप्रवेश..!
चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद आणि जनाधार सिद्ध करत भाजपासह विविध राजकीय पक्षांना मोठा धक्का दिला आहे….!
३५ ते ४० गावांतील विविध पक्षांचे शेकडो पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत शिवसेनेचा भव्य व ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला…!
“कार्यकर्ता माझ्यासाठी जीव की प्राण आहे; कार्यकर्त्याचे दुःख हेच माझे दुःख आहे,” असे भावनिक उद्गार काढत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांशी असलेले आपले अतूट नाते अधोरेखित केले.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा दि. २७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रेरणेतून तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…!
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजपा, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच इतर विविध पक्षांशी संलग्न असलेल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला…!
आपले मनोगत व्यक्त करताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले की,
“कार्यकर्ता माझ्यासाठी केवळ राजकीय सहकारी नाही, तर माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझा प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासाठी जीव की प्राण आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी माझ्या अंतःकरणाला चटका लावते आणि त्याला होणारे प्रत्येक दुःख मी माझ्या मनावर घेतो. कार्यकर्त्याच्या सुखातच माझा आनंद आहे आणि त्याच्या विश्वासावरच माझे नेतृत्व उभे आहे. जो कार्यकर्ता माझ्यासाठी रात्रंदिवस झटतो, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे केवळ माझे कर्तव्य नाही, तर माझा धर्म आहे.”
या सोहळ्यात व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना नेते भास्करराव मोरे, चिखली शहरप्रमुख विलास घोलप, कपिल खेडेकर,उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, दीपक तुपकर, शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, बुलढाणा शहरप्रमुख आशिष जाधव, मदनराजे गायकवाड मा प, समिती सभापती ,उदयनगर सरपंच श्री मनोज लाहुडकर, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख केवलसिंग ठाकूर,अक्षय करंडे,रोहन करंडे,तुळशीराम काळे,अमोल शिंदे,ज्ञानेश्वर वाघ, पिंटू गायकवाड,ओमराजे गायकवाड, गणेश भवर, शाम गायकवाड, विष्णू मेथे, सतिष वाघ,शिवाजी शिराळे, राम शेळके, गजानन जाधव,अनिल सुसर,मयूर पडोळ,युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,महिला आघाडी शहरप्रमुख मयुरीताई देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत “शिवसेना वाढवण्याचा आणि संघटना अधिक मजबूत करण्याचा” संकल्प केला. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे यांनी केले. उपस्थित शिवसैनिक, माता-भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून हा सोहळा ऐतिहासिक ठरवला.






