जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
कुमावत समाजाच्या वतीने भव्य आयोजन; संतांच्या उपस्थितीत प्रबोधन, १० मुलांना दत्तक घेण्याची घोषणा
पाचोरा (जि. जळगाव) – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पाचोरा येथे कुमावत समाज विकास सेवा संस्थेच्या वतीने रामनवमी उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ कुमावत यांनी केले. संपूर्ण पाचोरा परिसर या मंगलमय सोहळ्यामुळे श्रीराम भक्तीमध्ये तल्लीन झाला होता.
या भव्य कार्यक्रमाला गुरुवर्य १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर माऊली (सिद्धेश्वर आश्रम, बेलदार वाडी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून समाजबांधवांना धार्मिक व सामाजिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाला समाजभूषण संजयभाऊ हिरालाल कुमावत, तहसीलदार विनोद कुमावत, हिरालालजी कुमावत, रघुनाथ कुमावत, नगरसेविका जयश्री नरेंद्र पाटील तसेच सुरज वाघ यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी संजयभाऊ कुमावत यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १० मुलांना दत्तक घेण्याची घोषणा करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहायक अधिकारी कैलासभाऊ कुमावत यांच्यासह जिल्हा सचिव ज्ञानेश्वर कुमावत, सहसचिव अण्णा बेलदार, तसेच योगेश, राजेंद्र, संजय, नारायण, अनिल, सचिन, नाना, भारत, शरद, श्याम, प्रकाश, शालिक, दिलीप, आबा आदी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
उत्सवाच्या सांगतेनंतर सर्व समाजबांधवांनी पुरणपोळीच्या महाप्रसादाचा आनंद घेतला. या भक्तिमय सोहळ्यामुळे पाचोरा शहरात सर्वत्र ‘जय श्रीराम’चा गजर घुमत होता.






