Home / Uncategorized / आमदार श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘द केरला स्टोरी 2’चे मोफत प्रदर्शन…

आमदार श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘द केरला स्टोरी 2’चे मोफत प्रदर्शन…

चिखली : उमा जैवाळ 

चिखली शहरात जय माता दी मित्र परिवार आणि दयावान फाउंडेशन यांच्या वतीने श्वेता ताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजजागृतीपर अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने महिलांसाठी ‘द केरला स्टोरी 2’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमाला चिखली शहरातील महिलांनी व तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. सकाळपासूनच महिलांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती. समाजजागृतीचा संदेश देणारा चित्रपट पाहण्यासाठी महिलांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

चित्रपटातील वास्तवावर आधारित कथानक, महिलांवर होणारे अत्याचार, फसवणूक तसेच सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण पाहून अनेक महिला भावूक झाल्या. काही महिलांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. चित्रपट संपल्यानंतर महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत हा चित्रपट प्रत्येक महिलांनी पाहावा, असे मत व्यक्त केले.

महिलांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, समाजात घडणाऱ्या घटनांविषयी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असून महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. हा चित्रपट महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

जय माता दी मित्र परिवार आणि दयावान फाउंडेशन यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक विषयांवर चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला चिखली शहरातील विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर महिलांनी आयोजकांचे आभार मानत भविष्यातही अशा प्रकारचे समाजजागृतीपर उपक्रम आयोजित करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार