Home / Uncategorized / भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्राचार्य एन आर कोलते व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा..

भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्राचार्य एन आर कोलते व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत 

३५ वर्षांच्या समाजकार्यातील योगदानाबद्दल गौरव; दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव

सिल्लोड, सोयगाव व सावळदबाराचे माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार आदरणीय रावसाहेब दादा दानवे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरदन येथे विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यानिमित्त सावळदबारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी भोकरदन येथे जाऊन दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाऊराव लक्ष्मणराव कोलते, नारायण रायभान कोलते, संजय मुकुटराव चव्हाण, ज्ञानदेव खडके, रामचंद्र चिमणकर, दीपक मानकर, दिनकर शिपलकर, शंकर खराटे व गजानन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

रावसाहेब दानवे यांनी गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या कार्यातून अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी यावेळी दखल घेतली.

कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यश लाभावे, अशी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार