छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मनीष नरवडे यांची मनपा उपायुक्त अतिक्रमण विभाग उपआयुक्तकडे तक्रार..
छत्रपती संभाजीनगर;महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांवर आता ‘अपात्रतेची’ टांगती तलवार आहे. अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांमधून हात काढून घेण्यासाठी अनेकांनी आता सिडको आणि महापालिका प्रशासनाकडे पडद्या मागून धावपळ सुरू केली आहे. दंड भरून मागच्या तारखेने बांधकामे नियमित
होऊ शकतात का? अतिक्रमणे हटवून डोक्याचा ताप संपविण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांसह तिसऱ्या अपत्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः सिडको-हडको शॉपलेट आणि टपरी अनेकांनी पट्ट्यातील भूखंडांवर
नगरसेवकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी नियमांचे उल्लंघन करून बांधकामे केली आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. ११ चे नवनिर्वाचित नगरसेवक विश्वनाथ स्वामी यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी मुख्य जलवाहिनीवरच दुमजली इमारती आणि अनधिकृत होर्डिंग उभारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, अनधिकृत बांधकाम असणाऱ्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द होऊ शकते. नेमकी हीच भीती आता नगरसेवकांना सतावू लागली आहे. ज्या
बांधकामांना आजवर साधी परवानगी नव्हती, ती बांधकामे आता “नियमित” करण्यासाठी नगरसेवक प्रशासनाकडे अर्ज करत आहेत. अतिक्रमण पाडून नव्याने बांधकाम करण्याची परवानगी मिळवणे, साइड मार्जिन (मोकळी जागा) सोडल्याचे भासवून जुन्या चुका सुधारणे, राजकीय दबावाचा वापर करून सिडको किंवा मनपाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवणे, असे प्रकार सुरू असल्याबाबत सिडकोचे मुख्य प्रशासक आणि मनपा आयुक्तांना मनीष नरवडे यांनी तक्रार केली आहे. शिवाय झालेले अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नरवडे यांनी सुद्धा अतिक्रमण विभागाकडे केली..






