Home / Uncategorized / चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भरावलो : आ. कायंदेफातेमा शेख उर्दू शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील भावना

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भरावलो : आ. कायंदेफातेमा शेख उर्दू शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील भावना

देऊळगाव राजा : मुन्ना ठाकूर 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी मी भारावून गेलो असे भावनिक प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी पीएमश्री फातेमा शेख न प उर्दू प्राथमिक शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी तुषार शिपने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
स्वतंत्र भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक पीएमश्री फातिमा शेख नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेत, क्रीडा सप्ताह व कॅन्टीन डे व सांस्कृतिक कामाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या अध्यक्षा माधुरी तुषार शिपने होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार मनोज कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरील उद्गार काढले. याप्रसंगी शिक्षण सभापती नमीरा अतिक शेख, गटनेते प्रदीप वाघ, बांधकाम सभापती विष्णू झोरे, महिला बालकल्याण सभापती विकास कासारे, सामाजिक कार्यकर्ते हाजी मोहम्मद सिद्धीक, ज्येष्ठ नेते धनशिराम शिंपणे, नगरसेवक नासेर बागवान,हाजी नजीर, अन्वर शेख, काशिफ कोटकर, बाजार समितीचे संचालक गणेश डोईफोडे,तुषार शिपने, नगरसेवक गोविंद तिडके,माजी नगरसेवक म. रफिक,अशफाक टेलर,अफरोज बावा,सय्यद नईम, यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता. पुढे बोलताना आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्यावे भौतिक सुविधांची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार कायंदे यांनी दिली. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांनी शैक्षणिक गुणवत्ते बद्दल समाधान व्यक्त करताना उच्चश्रेणी मुख्याध्यापक अब्दुल हई यांच्या कामाचे शैक्षणिक व प्रशासकीय कार्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले. यावेळी नगरसेविका उषाताई गीते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पालक व शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार