Home / Uncategorized / चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोषराव वाकडे यांची तब्येत जाणून घेण्यासाठी मृत्युंजय गायकवाड यांची सदिच्छा भेट..

चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोषराव वाकडे यांची तब्येत जाणून घेण्यासाठी मृत्युंजय गायकवाड यांची सदिच्छा भेट..

 

📍 चिखली | दि. १८ मार्च २०२६
चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोषराव वाकडे यांना काही दिवसांपूर्वी विद्युत तारांचा शॉक लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली.
ही भेट चिंचोले हॉस्पिटल येथे देण्यात आली. यावेळी त्यांनी संतोषराव वाकडे यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करत त्यांना धीर दिला तसेच लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या….!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांचे सुपुत्र म्हणून मृत्युंजय संजय गायकवाड यांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याचे यावेळी दिसून आले….!
या प्रसंगी श्री गणेश यंगड, विलास घोलप, कपिल खेडेकर, दीपक तुपकर, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, विष्णू मेथे, अभिषेक वीर, पवन चिंचोले, विठ्ठल जगदाळे, राम शेळके, राजेश पवार, पिंटू गायकवाड,गजानन गायकवाड, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच संतोषराव वाकडे यांच्या कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सदिच्छा भेटीमुळे त्याठिकाणी आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसैनिकांप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार