चिखली : उमा जैवाळ
📍 चिखली | दि. १८ मार्च २०२६
चिखली येथील स्वर्गीय कमलबाई बदर यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी मृत्युंजय संजय गायकवाड यांनी बदर कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या. तसेच या कठीण प्रसंगी धीर धरण्याचे आवाहन करत दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप, विठ्ठल जगदाळे, कपिल खेडेकर, विष्णू मेथे, गोपाळराव जाधव,दीपक तुपकर,अभिषेक वीर, पवन चिंचोले, ज्ञानेश्वर खांडवे,यांच्यासह परिवारातील नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सांत्वन भेटीतून समाजातील दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली…






