Home / Uncategorized / कीर्तनकारावर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पारनेर तालुक्यात खळबळ; दत्तात्रेय गोसावी यांची माहिती…

कीर्तनकारावर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पारनेर तालुक्यात खळबळ; दत्तात्रेय गोसावी यांची माहिती…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पारनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८) याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन सामाजिक विश्वास संपादन केला होता. मात्र, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १७) गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीच्या प्रतिमेला चपलेचा हार घालून दहन करण्याचा निर्णय घेतला. तसेच संपूर्ण गाव बंद ठेवण्याची घोषणा सरपंच नंदा भागाजी गावडे यांनी केली आहे.
दरम्यान, आरोपी हा सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून त्याचे वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची एक पत्नी त्याला सोडून गेली असून दुसरी पत्नी सध्या नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जाते. तसेच सिन्नर परिसरात त्याच्यावर यापूर्वीही चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
या संदर्भात सिन्नर तालुक्यातील बारा गाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी सांगितले की, “कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या या व्यक्तीने लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली असून, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी दत्तात्रेय रामचंद्र गोसावी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार