Home / Uncategorized / छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू खाटीक समाजाची महत्त्वपूर्ण बैठक; नवीन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पुढाकार…

छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू खाटीक समाजाची महत्त्वपूर्ण बैठक; नवीन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पुढाकार…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

महिला व युवकांना स्वतंत्र प्रतिनिधित्व; 19 मार्च रोजी क्रांती चौक येथे अंतिम निवड; शांताराम खराटे यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर;छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हिंदू खाटीक समाज बांधव व भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत नवीन जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रदेश कार्याध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांची यादी सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात माजी पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली असता, अनेक सभासदांनी एकमताने जाहीर बैठक घेऊन सर्वांच्या समक्ष चर्चा करूनच पदाधिकाऱ्यांची निवड करावी, अशी भूमिका मांडली. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी महिला व युवकांसाठी स्वतंत्र जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीस उपस्थित राहू न शकणाऱ्या इच्छुकांनीही निराश होण्याचे कारण नसून, त्यांनी निवड समितीतील सदस्यांशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा इच्छुकांचा विचारही बैठकीत प्राधान्याने केला जाणार आहे.

जिल्ह्यातील गरजेनुसार 11 किंवा 21 सदस्यांची कार्यकारिणी गठीत केली जाणार असून, निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेश कार्यकारिणीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

ही बैठक दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता क्रांती चौक उड्डाणपुल येथे होणार आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजकार्याला बळ द्यावे, असे आवाहन भाजप किसान सेना मोर्चाचे सोयगाव तालुका अध्यक्ष शांताराम खराटे यांनी केले आहे.

निवड समितीमध्ये प्रल्हादराव माकोडे (अध्यक्ष), छगनराव पारडे, शांतारामजी खराटे, शिवाजीराव रावळकर, प्रमोदजी रावळकर, डॉ. संजय रत्नपारखी, नारायण पवार, भानुदास घोणे, हर्षल गायगोले (अध्यक्ष), सतीश मंडवे, सुरेश घन, सुनीताबाई भोकरे (अध्यक्ष) आणि शैलाबाई लाड यांचा समावेश आहे.

समाजातील एकजूट आणि संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप किसान सेना मोर्चाचे तालुकाध्यक्ष शांताराम खराटे यांच्या कडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार