(छत्रपती संभाजी जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)
महिला हि जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिंधी कॉलनीतील मंदिराच्या समोर तीच्या वडीलांनी सोबत मिळुन आली होती वडिलहि मानसिक आजाराने त्रस्त
जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.-१४/०३/२०२६ रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील एक मनोरुग्ण महिला हि बेवारस अवस्थेत तीच्या वडीलांनी सोबत मंदिराच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून होती आईच्या निधनानंतर हे कुटुंब रस्त्यावर आले तीच्या वडिलांना दारुचे वेसन असल्याचे त्यांना हि मानसिक आजार जडला आहे.
परिस्थिती एवढी बीकट होती कि सर्वदूर दुर्गंधी पसरली होती कोन्हि खायला दिले ते खायचे आणि तीथेच घान करायची असा गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरीक त्रस्त झाले होते सिंधी समाजातील जानकार मंदिराच्या ट्स्टि् नी त्यांना एका बांधकामासाठी बांधलेल्या पत्रेच्या शेड मध्ये राहायला जागा दिली होती परंतु काही अपप्रकार घडु नये ती मुलगी तरुन आहे तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवाहरनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना सदर महिलेची माहिती दिली.
मा.पो.नि.सो.सचिन कुभार यांनी बेवारस मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला व सदर महिलेची माहिती दिली कि यात आपन काही मदत करु शकता का. माणुसकी वृद्ध सेवालयाचे सर्वा सर्वे सुमित पंडित व पुजा पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सर्व परिस्थिती लक्षात घेत सिंधी समाजातील काही जानकार मंदिराच्या ट्स्टि् शंकर बजाज ट्स्टि् अध्यक्ष,ओमप्रकाश बजाज,भरत नीहालानी,सेवकराम तोलवाणी,
गणेश पदवाणी, पुरुषोत्तम इसराणी,वीनोद चोटलाणी, यांच्या शी चर्चा करित त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आले व पुढिल तीच्या पुनर्वसनासाठी ची जबाबदारी माणुसकी समुहाचे स्वीकारली व पोलीसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात
प्रथमोपचाकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले.असता तीस मानसिक आजार असल्याने डॉ सांगितले व तीच्यावर उपचार सुरु केले.तरी तीला तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा येथे पुनर्वसनासाठी पोलीसांनी दाखल केले.या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी झोन २, मशीन कल्याणकर सा.पो.आयुक्त,सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहर नगर,मारुती खील्लारे पो.उप निरिक्षक, बनकर पो.अ,एच एस आघाडे मॅडम महिला पोलिस अंमलदार,माणुसकी समुहाचे सुमित पंडित,संचालीका माणुसकी वृध्द सेवालय पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली…

सदर महिलेला जवळचे सांभाळनारे नातेवाईक नसल्याने तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या महिला नामे मुस्कान ला एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली. ती मानसिक आजाराने पीडित आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही, तर अजून कितीतरी असतील. ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल.आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल, सुमित व पुजा सारखे बेवारसांचे पाठिराखे व त्यांना मायेचा आधार देण्यासाठी तप्तर पोलीसांना माणुसकी समुहाची वेळोवेळी खुप मदत होत आहे आतापर्यंत आमच्या पोलीस स्टेशन हद्दीतील ६ मनोरुग्ण महिला व पुरुषांना आधार सुमित पंडित यांनी दिला आहे.

श्री सचिन कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जवाहरनगर,






