Home / Uncategorized / जिल्हास्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा १७ वर्षांतील संघ विजयी; नाशिक विभागीय स्तरावर निवड..

जिल्हास्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा १७ वर्षांतील संघ विजयी; नाशिक विभागीय स्तरावर निवड..

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जळगाव;कुसुंबा (ता./जि. जळगाव) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

 

या स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १७ वर्षांखालील मुलांचा संघ विजयी ठरला. या संघाची नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच १७ व १९ वर्षांखालील मुलींचा संघ उपविजयी ठरून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली.

 

स्पर्धेनंतर विजयी संघांचा सत्कार श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थाध्यक्ष मनोज पाटील, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, संघटनेचे सचिव संजय निकम, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पी पी पाटील, प्रशांत महाजन, गिरीश महाजन, जी. सी. पाटील आदी. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस. एन. चवरे व उपप्राचार्य प्रा.डी. झेड. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख जी. सी. पाटील, बी. पी. बेनाडे, सौ. कीर्ती पाटील, गजानन कचरे व उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडाशिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार