छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी श्रीपत पवार
जवाहरनगर परिसरात दहशितीचे वातावरण निर्माण करीत होता मनोरुग्ण…
सदर मनोरुग्ण व्यक्ती नामे सौरभ हिरोबा देवर्षी राहणार वसंतनगर जवहार कालनी परीसरातील स्थानिक नागरिकांनी व त्याचे मामा सुरेश औरंगे यांनी पोलीस स्टेशन येथे वारंवार माहिती दिली कि सदर व्यक्ती हा हिंसक वागत आहे.व दगडे हातात घेऊन मारहाण करित आहे.व रात्री बेरात्री परिसरात फिरतो जोरजोरात ओरडतो रोडवरील चालु वाहनांना आडवतो
त्यापासून लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.व तो बऱ्याच दिवसापासून मनोरुग्ण सारखे वागत आहे.त्याचे आई वडील वृद्ध मयत आहे.मामाच त्याचा सांभाळ करीत होते त्यांना देखील मारहाण करतो.मामांनी त्यास प्रेरणा हास्पीटल येथे उपचार घेतले आहे परंतु त्याचा मानसिक आजार आता जास्त झाल्याने तो धिंगाणा घालत आहे.अशि माहिती परिसरातील नागरिकांनी व त्यांचे मामा यांनी जवाहरनगर पो.स्टे ला दिली असता जवाहरनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन कुंभार यांना दिली जवाहरनगर पोलीसांनी सदर मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना सदर रुग्णाची माहिती दिली.सुमित यांनी तात्काळ पो.स्टे. येथे जाऊन वसंतनगर परिसरात पेशंट ला शोधुन शाहनीशा केल्यावर सदर रुग्ण सौरभ हा मोठमोठे केस व दाढि वाढकुन जोरजोराने ओरडत होता.सदर रुग्णाला ताब्यात घेणे मोठे अवघड झाले होतो.तो हिंसक वृत्ती चा असल्याने कोन्हाला जवळहि येवुन देत नव्हता सदर मनोरुग्ण यास उपचारासाठी पुणे येथे घेऊन जावे सोपे नव्हते सुमित पंडित यांनी शासकीय रुग्णालय घाटि मानस उपचार तज्ञ श्री प्रसाद देशपांडे यांचा सल्ला घेतला व त्यास जवाहरनगर पोलीसांच्या मदतीने त्यास माणुसकी समुहाच्या टिम ने त्यास हात पाय बांधून ताब्यात घेतले व शासकीय रुग्णालय संभाजीनगर घाटी रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ यांनी औषधोपचार करून त्यास पुढिल उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथे नेण्याचा सल्या डाँक्टरांनी दिल्यानंतर कायदेशीर कागदोपत्री पुर्तता करुन आज त्यास येरवडा पुणे येथे १०८ अँबुलंस वाहनाने उपचारासाठी माणुसकी टिम च्या सभासदांनी मदतकार्य करुन उपचारासाठी दाखल केले.सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी झोन-२,मशीन कल्याणकर, सा.पो.
आयुक्त,सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहर नगर,मारुती खील्लारे पो.उप निरिक्षक,
जमधडे,राजेश चव्हाण,१०८ अँबुलंस डि.एम.अतुल मुरुगकर,
ए डि.एम.सचिन पालवे,डॉ किरण देशमुख,माणुसकी समुहाचे सुमित पंडित,संचालीका माणुसकी वृध्द सेवालय पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.
माणुसकी समुहाचे कार्य मनोरुग्णानसाठि लाख मोलाचे पोलीसांना होतीय मोठि मदत
मनोरुग्णांच्या जवळ देखील कोणी जायला तयार होत.हे आम्ही स्वतः अनुभवले नाही ते खूप सेन्सिटिव्ह असतात कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात परंतु समाजसेवक सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्यांच्या सेवा ही खरंच वाखाडणे योग्य आहे.
मनोरुग्णानसाठि ते स्वतःदाढी कटिंग व स्वच्छ अघोळ घालुन त्यांना माणसात आणतात व त्यांना हक्काचा निवारा मिळवून देतात आज प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी त्यांना या मनोरुग्णाच्या कोणी जवळही जाण्याची हिंमत करत नव्हते त्याप्रसंगी समाजसेवक सुमित पंडित यांनी मोठे हिमतीने त्या कायदेशीर प्रक्रीया करुन
उपचारासाठी पुणे येथे दाखल केले आहे.पोलीसांना सुमित पंडित हे रात्री बेरात्री फोन केला की नि स्वार्थ भावनेने मदतीसाठी तयार असतात त्यांची पोलीसांना वेळोवळी मदत होत आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार समाजात अशी खूप कमी लोक आहेत की ते दुसऱ्यासाठी जगतात..
—- सचिन कुंभार पोलिस निरीक्षक जवाहरनगर पोलीस स्टेशन






