छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त देव्हारीत भव्य मिरवणूक; इद्रिसजी मुलतानी यांनी मानले गावकऱ्यांचे आभार
देव्हारीत संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात; इद्रिसजी मुलतानी यांचा जनतेला शब्द — “दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू”
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथे संत सेवालाल महाराज यांची २८८ वी जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी विशेष उपस्थिती लावली.
प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन इद्रिसजी मुलतानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजयी उमेदवार माहिन इद्रिस मुलतानी, उत्तम महारु चव्हाण व राहुल राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर जयंतीनिमित्त भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत ही मिरवणूक संपूर्ण गावातून फिरली. परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
मिरवणुकीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना इद्रिसजी मुलतानी म्हणाले, “देव्हारीकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही कधीही विसरणार नाही. निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू. जनतेच्या कोणत्याही कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
तसेच विजयी केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण गावातील नागरिकांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त देव्हारीत सामाजिक एकतेचे आणि भक्तीभावाचे सुंदर दर्शन घडले.






