Home / Uncategorized / सोयगाव : – बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी गाव तेथे बोद्धाचार्य व बुद्ध विहारे निर्माण व्हावे – केंद्रीय शिक्षक किशोर जोहरे…

सोयगाव : – बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी गाव तेथे बोद्धाचार्य व बुद्ध विहारे निर्माण व्हावे – केंद्रीय शिक्षक किशोर जोहरे…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जंगलागाव (ता.सोयगाव) येथे दहा दिवसीय श्रामनेर व बोधाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप

सोयगाव ; बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी गाव तेथे बोद्धाचार्य व बुद्ध विहारे केंद्र बिंदू ठरावी.या माध्यमातून उद्याचा भारत देश घडल्यास पुन्हा सम्राट अशोकाचा सुवर्ण काळ येईल असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर किशोरजी जोहरे यांनी शुक्रवारी (दी.१३) जंगलागाव (ता.सोयगाव) येथे केले.

भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा छ्त्रपती संभाजीनगर (पूर्व) यांच्या विद्यमाने तालुक्यातील भीमनगर जंगलागाव येथे बुधवार (दी.४) ते शुक्रवार दी.१३ मार्च दहा दिवसीय श्रामनेर व बोध्दाचार्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते.या शिबिराची सांगता शुक्रवारी करण्यात आली.

छ्त्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या अध्यक्षस्थातेखाली झालेल्या सांगता समारोहोच्या धम्म पिठावर भंते नागार्जुन तथा केंद्रीय शिक्षक एस टी काळे, राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर किशोरजी जोहरे,पूर्व जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे,जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे, जिल्हा संस्कार सचिव वसंत पगारे, महिला जिल्हा संघटीका कमलाबाई मधुकर पगारे, कन्नड तालुका अध्यक्ष रमेश धनेधर ,सोयगाव तालुका अध्यक्ष मुकुंदा वाहूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरादरम्यान भंते नागार्जून यांनी श्रामनेर व बोधाचार्या शीबिरार्थीना दहा दिवसीय शिबिरात बुद्ध धम्माचा अभ्यास दिला.तसेच भावी जीवनात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी गाथा घेऊन चीवर उतरविण्यात आले.तसेच शिबिरार्थिना मान्यवरांच्या हस्ते श्रामनेर प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर किशोरजी जोहरे यांनी उपस्थित पदाधिकारी, भिख्खू गण व श्रामनेर संघासह उपासक – उपसिकांना मार्गदर्शन करताना बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी तन,मन धन व वेळेचे दान देण्याचे आवाहन केले.तसेच वेळोवेळी संस्थेने ठरवून दिलेले २५ सूत्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करावे व गावोगावी धम्म रुजविण्याचे आवाहन केले.

जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सोयगाव तालुक्यातील हे शिबिर अप्रतिम ठरल्याचे म्हटले.या पुढे देखील तालुका शाखा वेगवेगळ्या प्रकराची २४ शिबिरे आयोजित करणार असून उपासकांनी असेच सहकार्य ठेवावे.आपल्या योगदानातून भारतीय बौद्ध महासभा आंबेडकरी घराण्याच्या अश्र्वगतीने चाललेल्या धम्म रथाला पुढे नेण्याचे कार्य करीत असल्याचे म्हटले.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे, कन्नड तालुका अध्यक्ष रमेश धनेधर,जिल्हा संस्कार सचिव वसंत पगारे,महिला तालुका अध्यक्ष सुरेखा तायडे,सुशीला इंगळे, कू.आरुषी सोनवणे यांनी श्रामनेर संघाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या ययशस्वीतेसाठी तालुका संघटक संजय सोनवणे,संतोष मोरे,परमेश्वर मोरे,भगवान सोनवणे,रवींद्र साळवे,रवि बिऱ्हारे,जयदीप जाधव,दिनेश सोनवणे,प्रमिला निकम, व जंगलागाव, गलवाडा, जरंडी, कवली सरपंच वसंत बनकर,सोयगाव,येथील श्रद्धावान बौद्ध उपासक व उपसिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे यांनी मानले.

कार्यक्रमास सोयगाव तालुक्यातील व परिसरातील बौद्ध उपासक उपसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. असल्याचे माहिती तालुका अध्यक्ष भरत पगारे यांनी बोलताना सांगितले.

जंगलागाव (ता.सोयगाव) येथे दहा दिवसीय श्रामनेर व बोधाचार्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्य संघटक किशोर जोहर व मंचावर उपस्थित भंते गण,जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे,प्रकाश हिवराळे, उपासक उपासीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार