Home / Uncategorized / कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणातील कुरुक्षेत्र तर तायकांदो स्पर्धेसाठी ओडिशातील बालासोर येथे प्रतिनिधित्व

कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणातील कुरुक्षेत्र तर तायकांदो स्पर्धेसाठी ओडिशातील बालासोर येथे प्रतिनिधित्व

 

गरुड महाविद्यालयाच्या खेळाडूंची अखिल भारतीय स्पर्धेसाठी दमदार निवड; डॉ महेश पाटील

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील अ.र.भा. गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ पातळीवरील कुस्ती व तायकांदो स्पर्धेसाठी महाविद्यालयातील खेळाडूंची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयातील कु. गौरी कुमावत (SYBSc), कु. हर्षदा चौधरी (TYBSc) आणि कु. लोचाना चौधरी (SYBSc) या विद्यार्थिनींची हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर कु. गौरी कुमावत हिची ओडिशा राज्यातील बालासोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायकांदो स्पर्धेसाठी देखील निवड झाल्याने महाविद्यालयाचा लौकिक अधिक उंचावला असल्याचे प्रा डॉ महेश पाटील शेंदुर्णी यांनी बोलताना सांगितले आहे.

या विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवे बळ मिळाले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचे दर्शन घडविण्याची संधी मिळाल्याने या खेळाडूंमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

या यशाबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हाईस चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड, सर्व संचालक मंडळ तसेच संपूर्ण संस्था परिवार यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, डॉ. अमर जावळे, प्रा. आप्पा महाजन, क्रीडा संचालक प्रा. डॉ. महेश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शेंदुर्णी परिसरातून राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होत असल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत असल्याचे डॉ महेश पाटील सर शेंदुर्णी यांनी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार