Home / Uncategorized / वरठाण येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्सहात संपन्न…

वरठाण येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्सहात संपन्न…

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव;वरठाण येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन कृषी विभाग महाराष्ट्र शासन तसेच तालुका कृषी अधिकारी सोयगाव यांच्या वतीने वरठाण येथील प्रगतीशील शेतकरी श्री. श्रावण गायकवाड यांच्या भुईमूगाच्या शेतावर करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिमायतबाग फळसंशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.श्री. संजय पाटील सोयगावकर हे उपस्थित होते. त्यांनी तेलबिया पिकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. सोयगाव तालुका कृषी अधिकारी श्री.भारत कासार साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शेतकऱ्यांना तेलबियांचे आहारातील महत्त्व सांगितले. मंडळ कृषी अधिकारी फर्दापूर श्री. रमेश गुंडीले यांनी घरघुती तेलघाणे चालु करुन शेतकऱ्यांनी शासनाच्या PMFME योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. उप कृषी अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांनी भुईमूग शेती वर सविस्तर मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी श्री. समाधान चौधरी यांनी फार्मर वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. सहायक कृषी अधिकारी श्री.योगेश पवार यांनी सोयाबीन आणि सूर्यफूल यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यशाळेचे वरठाण गावचे सरपंच श्री. अनिल सोळंके यांनी अध्यक्षस्थान भूषविले तसेच शेतकऱ्यांना तेलबिया लागवड करण्यास आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी श्री. कैलास कुमावत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सहायक कृषी अधिकारी श्री. विजयसिंग निकुंभ यांनी केले. सदरील कार्यशाळेस मंडळ कृषी अधिकारी बनोटी श्री. प्रभु सपकाळ, उप कृषी अधिकारी श्री. अतुल पाटील, श्री. किशोर महाजन तसेच सहायक कृषी अधिकारी श्री. बेबीचंद चौरे, संजय बिऱ्हारे, निलेश महाले, अर्जुन सुरळकर, मयूर बारी, विश्वजित तायडे, प्रशांत जाधव, श्रीमती. राधिका सोळंके, ललिता साळवे, सरला चव्हाण, तसेच कृषी सेवक श्री. अक्षय सावसक्के, हितेश झाडे, योगेश पवार, वैष्णवी भगत, धनश्री व्यवहारे, वैष्णवी नन्नावरे, पुनम सोळंके इ. तसेच उपसरपंच श्री. धरमसिंग सोळंके, श्री. सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल सूर्यवंशी, श्रावण गायकवाड, भावराव मोरे, ईश्वर सपकाळ, बाळासाहेब पाटील, गणेश निकम, गजानन चाथे, सुनील जैन, रेवनसिंग सोळंके तसेच वरठाण, घोरकुंड परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती कृषी सहायक अधिकारी कैलास कुमावत यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार