Home / Uncategorized / नवोदय पात्रता परीक्षेत यशस्वीतेबद्दल कीर्तीमालिनी गायकवाड हिचा कोळी बोडखा जि.प. शाळेत सत्कार..!

नवोदय पात्रता परीक्षेत यशस्वीतेबद्दल कीर्तीमालिनी गायकवाड हिचा कोळी बोडखा जि.प. शाळेत सत्कार..!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

 

कोळी बोडखा (तालुका पैठण) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षिका श्रीमती सविता नितीन गायकवाड (जगताप) यांची कन्या कु. कीर्तीमालिनी गायकवाड हिने नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा 2025–26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणारी ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते. ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. अशा कठीण परीक्षेत कीर्तीमालिनीने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कोळी बोडखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तिचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोटफोडे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक इब्राहिम शेख, शिक्षिका गंगथडे, गहेरवार, जगताप, सुमेरा, तनवीर मॅडम तसेच शिक्षक विकास आंधळे, दादासाहेब ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थीनी कीर्तीमालिनी चे पालक सविता – नितीन गायकवाड यांना शुभेच्छा देऊन सर्व मान्यवरांनी कीर्तीमालिनीच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार