
चिखली : प्रतिनिधी उमा जैवाळ
चिखली शहरात अखिल भारतीय माळी महासंघ तालुका व चिखली शहर महिला आघाडीच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मंगळवार (दि. १० मार्च २०२६) रोजी आयोजित कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाच्या सिनेट अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. मिनल गावंडे या होत्या.
यावेळी नगरसेविका सुषमा चव्हाण, शिक्षिका सौ. छाया वानेरे, अखिल भारतीय माळी महासंघ महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा गीता ताई बांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान अवनी अक्षय बांडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाला विजय राजाभाऊ खरात (जिल्हाध्यक्ष), अभय तायडे, राजेश मेहेत्रे, प्रा. दीपक नन्हई, बंडूभाऊ खरात, गजानन मोळवणे, प्रशांत जैवाळ, दिपकराजे देशमाने, गजानन बांडे, प्रल्हाद बांडे, विष्णू बांडे, अभिषेक बांडे, विजयराव सोनुने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल प्रल्हाद बांडे हिने केले. यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा संदेश देण्यात आला.
(लोक महाराष्ट्र न्यूज)






