चिखली प्रतिनिधी ( लोक महाराष्ट्र न्यूज )
चिखली, दि. ५ मार्च २०२६
चिखली शहरात गौसंरक्षण तसेच अवैध गौकत्तल व गौमांस विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला संत समाजाचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनास समर्थन देण्यासाठी अंतरराष्ट्रीय कथावाचक व सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा समितीचे मुख्य संयोजक युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज (काशी–वाराणसी) हे दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता चिखली येथे उपोषणस्थळी भेट देणार आहेत.
गौरतलब आहे की श्री ओम राजे गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे गौसंरक्षणाच्या मागणीसाठी चिखली येथे आमरण उपोषण सुरू आहे. शहरात जर कुठेही अवैध गौकत्तल किंवा गौमांस विक्री होत असेल तर त्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज हे अंतरराष्ट्रीय कथावाचक असून ते सनातन धर्म, संस्कृती आणि गौसंरक्षणाच्या कार्यात सक्रिय आहेत. मागील वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली “सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा” महाराष्ट्रात काढण्यात आली होती. या यात्रेद्वारे गौमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा, गोहत्या पूर्णतः बंद व्हावी तसेच सनातन धर्माबाबत समाजात व्यापक जनजागृती व्हावी असा संदेश देण्यात आला होता.
महाराजांनी सांगितले की गौमाता ही सनातन हिंदू धर्मात पूजनीय असून तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक धर्मप्रेमीचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाने गौमातेला राज्यमाता म्हणून मान्यता दिलेली असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच त्यांनी सर्व सनातन हिंदू धर्मप्रेमी बांधवांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून गौसंरक्षणाच्या या आंदोलनाला आपले समर्थन द्यावे.
—






