Home / Uncategorized / जवाहरनगर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : चोरीला गेलेले व हरवलेले १६ मोबाईल नागरिकांना परत..

जवाहरनगर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : चोरीला गेलेले व हरवलेले १६ मोबाईल नागरिकांना परत..

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जवाहरनगर पोलीस स्टेशनने नागरिकांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवत चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून काढत ते परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केला. जवाहरनगर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान व तपासाच्या माध्यमातून बाहेरील राज्य तसेच जिल्ह्यातून नागरिकांचे तब्बल १६ मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले असून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले.

दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात मोबाईल परत देण्याचा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) श्री. कल्याणकर साहेब तसेच पोलीस निरीक्षक (PI) श्री. सचिन कुंभार साहेब प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले.

गेल्या काही काळात परिसरातील अनेक नागरिकांचे मोबाईल हरवणे किंवा चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत नागरिकांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्या तक्रारींचा गांभीर्याने तपास सुरू केला. मोबाईल ट्रॅकिंग प्रणाली, तांत्रिक विश्लेषण तसेच विविध जिल्हे व राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधत तपास केल्यानंतर १६ मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त करत जवाहरनगर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी नागरिकांना मोबाईल वापरताना काळजी घेण्याचे तसेच मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचे आवाहनही केले.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबरोबरच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार