छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
येवला;समस्त येवला, शहर, नागरिकांकडून शिक्षण कर नियमितपणे वसूल करणाऱ्या येवला नगरपरिषदेच्या अखत्यारित एकही शाळा नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आज डोळ्यातून समोर आली आहे. शिक्षणाच्या नावाखाली कर घेतला जातो, मात्र त्याचे प्रत्यक्ष शैक्षणिक सुविधांमध्ये रूपांतर होत नसल्याने येवला शहर सर्व नागरिक संतप्त झालेले आहेत. “कर आहे… पण शिक्षण सुविधा कुठे…?” असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
लहान मुलांच्या मूलभूत शिक्षणासाठी आवश्यक असलेली बालवाडी व अंगणवाडी केंद्रे ठीक – ठिकाणी का उपलब्ध नाही, दररोज स्वछता कर्मचारी येत नाही, पिण्याचे पाणी अत्यंत दूषित व गडूळ येत आहे शहरा मध्ये नवं वसाहती मध्ये रस्ता व भूमीगत, गटारी नाही राज्यात लोक प्रसिद्ध असलेली येवला नगरपरिषदेच्या रीतसर अधिकारात त्वरित सुरू करण्याची जोरदार जाहीर प्रमुख मागणी राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघा चे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी राज्यपाल साहेब व. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या कडे केली आहेत. संपूर्ण शहरातील बालकांच्या शिक्षण आणि पोषणाच्या दृष्टीने ही जनते ला अत्यंत सुविधा – अत्यावश्यक असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगरपरिषदेने शिक्षण कराचा हिशोब सार्वजनिक करावा आणि तात्काळ पणे, शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी ठोस निर्णय जलद गतीने घ्यावेत, अशी मागणी, सर्व समस्त येवला शहरातील नागरिकांकडून अति जोमाने होत आहे. अन्यथा हा अति गंभीर प्रश्न अधिक तीव्र जोमाने जागृत होण्याची चिन्हे दिसत आहेत.असे निवेदनात म्हटले आहेत.अन्यथा समस्त येवला शहर वासियांना येत्या 4 दिवसात न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आम्ही सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे.






