Home / Uncategorized / तांड्या-वस्त्यांवर रंगला होळीचा जल्लोष; इद्रिसजी मुलतानींच्या उपस्थितीने सणाला राजकीय-सामाजिक एकतेची धार..

तांड्या-वस्त्यांवर रंगला होळीचा जल्लोष; इद्रिसजी मुलतानींच्या उपस्थितीने सणाला राजकीय-सामाजिक एकतेची धार..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

 

सोयगाव तालुक्यात अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांचा तांड्या-वस्त्यांवर दौरा; बंजारा समाजासमवेत धुलिवंदन उत्साहात

सोयगाव तालुक्यातील तांड्या-वस्त्यांवर होळी व धुलिवंदनाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दि. ३ मार्च २०२६ रोजी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमधील देव्हारी, टिटवी, नादातांडा, घाणेगाव तांडा, चारू, जामठी आदी गावांना भेटी देत बंजारा समाजाच्या प्रमुख सण-उत्सवात सहभाग नोंदवला.

तांड्यांवर पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात आलेल्या होळी-धुलिवंदन सोहळ्यात मुलतानी यांनी नागरिकांशी संवाद साधत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला. “सण-उत्सव हे समाजाला एकत्र आणणारे बळ आहे. तांड्या-वस्त्यांवरील नागरिकांशी थेट संवाद साधणे हीच खरी लोकसेवा,” असेही अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी बोलताना सांगितले

या दौऱ्यात पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, उत्तम चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, सरपंच वरदानसिंग चव्हाण यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना रंग लावत शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

तांड्या-वस्त्यांवरील या भेटींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सणाच्या निमित्ताने राजकीय-सामाजिक नेतृत्व थेट दारात पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार