Home / Uncategorized / विशाल लॉन्स अँड रिसॉर्ट : मंगल क्षणांना भव्यतेची राजेशाही साथ..

विशाल लॉन्स अँड रिसॉर्ट : मंगल क्षणांना भव्यतेची राजेशाही साथ..

जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत 

जिथे जुळतात नाती, घडतात आयुष्यभराच्या आठवणी;डि एन चौधरी

जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील विशाल लॉन्स अँड रिसॉर्ट हे केवळ एक मंगल कार्यालय नसून दोन कुटुंबांना एकत्र आणणारे, संस्कार आणि परंपरेची साक्ष देणारे एक पवित्र स्थळ म्हणून ओळखले जात आहे. लग्न म्हणजे फक्त समारंभ नसून तो दोन मनांचा आणि दोन परिवारांचा मिलाफ असतो. हा सोहळा अधिक भव्य, सुंदर आणि संस्मरणीय व्हावा यासाठी विशाल लॉन्स हे जामनेर तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील विश्वासार्ह नाव बनले आहे.आधुनिक सुविधा आणि पारंपरिक आपुलकीचा संगम

येथील प्रशस्त आणि आकर्षक ए.सी. हॉल, भव्य व देखणा स्टेज, आधुनिक लाईटिंग आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला राजेशाही स्वरूप प्राप्त होते. मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत उपलब्ध असून पाहुण्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते.

स्वच्छ व सुसज्ज स्वयंपाकगृह, २४ तास पाणीपुरवठा, जनरेटर व अखंड वीजबॅकअप, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने आयोजकांची मोठी चिंता दूर होते.

प्रत्येक मंगल प्रसंगासाठी सर्वोत्तम पर्याय,लग्न समारंभ, साखरपुडा, हळद, रिसेप्शन, वाढदिवस, नामकरण सोहळे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विशाल लॉन्स हे एक परिपूर्ण ठिकाण ठरत आहे. प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले जाते. पाहुण्यांचे स्वागत ते कार्यक्रमाचा यशस्वी समारोप — प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थापनाची दक्षता आणि समन्वय दिसून येतो.

🔸 सक्षम नेतृत्व आणि अनुभवी दिनकर डी. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली अनुभवी टीम प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तत्पर असते. सेवेत आपुलकी, कामात प्रामाणिकपणा आणि नियोजनात काटेकोरपणा या गुणांमुळे विशाल लॉन्सने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आयोजकांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांच्या सूचनांना विशेष महत्त्व दिले जाते.

🔸 जामनेरची ओळख बनलेले मंगलस्थान

“”””””भव्यता, सुविधा, विश्वास आणि समाधान यांचा संगम म्हणजे विशाल लॉन्स. आज हे ठिकाण जामनेर शहराच्या प्रतिष्ठेचे प्रतीक ठरले आहे. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण अधिक दिमाखदार आणि कायम स्मरणात राहतील अशा पद्धतीने साजरे करायचे असतील, तर विशाल लॉन्स अँड रिसॉर्ट हेच भविष्यात वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांची पहिली पसंती ठरणार आहे

विशाल लान्स अँन्ड रिसाॅर्ट डि एन चौधरी भुसावळ रोड जामनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार