Home / Uncategorized / जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एलसीबीचा धडक छापा…

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एलसीबीचा धडक छापा…

 

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

पहूर पोलिसांची संयुक्त कारवाई; लाखोंचा गांजा जप्त, दोन वाहने ताब्यात

तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू;सपोनि प्रमोद कोठारे

जामनेर तालुक्यातील पहूर येथे जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पहूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या धडक कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईत दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळच्या सुमारास संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी वाहनांची कसून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. या कारवाईमुळे महामार्गावरून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी जप्त पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पुढील तपासासाठी पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या संयुक्त कारवाईत पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, जप्त गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कुठे पाठविण्याचा बेत होता याचा तपास सपोनि प्रमोद कोठारे करीत आहेत. संबंधित आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सपोनि प्रमोद कोठारे यांनी दिली.

महामार्गावरील ही कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधातील पोलिसांच्या मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात असून, जिल्ह्यातील तस्करीच्या जाळ्यावर मोठा घाव बसल्याची चर्चा आहे. पुढील तपास पहूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार