Home / Uncategorized / जामनेरमध्ये होळीच्या पारंपरिक गाठी-कंगनांना दगड हलवाईंचा गोड वारसा; होलसेल दरात विविध पदार्थ उपलब्ध

जामनेरमध्ये होळीच्या पारंपरिक गाठी-कंगनांना दगड हलवाईंचा गोड वारसा; होलसेल दरात विविध पदार्थ उपलब्ध

 

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जामनेर : होळी सण अवघ्या एक दोन दिवसांवर येऊन ठेपला असून रमजान महिना सुरू झाला आहे याच पार्श्वभूमीवर जामनेर शहरासह परिसरात सणाची लगबग वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जामनेर येथील प्रसिद्ध मिलन हार कंगन सेंटर येथे पारंपरिक गाठी-कंगन, बत्तासे तसेच विविध गोड पदार्थांच्या तयारीला वेग आला आहे. रमजान महिन्यासाठी व होळी सणासाठी व लागणारे हार-कंगन, बत्तासे, तसेच ऑर्डरप्रमाणे गोडशेव व बुंदी होलसेल दरात तयार करून दिली जात असल्याने किरकोळ विक्रेते व ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे.

जामनेर व पंचक्रोशीतील गावांमध्ये होळीच्या दिवशी गाठी-कंगन अर्पण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जाते. या पारंपरिक रितीरिवाजांमध्ये गाठी-कंगनांना विशेष महत्त्व असून, सणाच्या दिवशी कुटुंबीय व भाविक मोठ्या श्रद्धेने हे साहित्य खरेदी करतात. हीच परंपरा टिकवून ठेवण्याचे कार्य अ. अजीज शे. दगडू हलवाई अनेक वर्षांपासून करत आहेत.

दगडू हलवाई यांनी आपल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. स्वच्छता, चव आणि दर्जा यांना प्राधान्य देत तयार होणारे गाठी-कंगन व गोड पदार्थ हे त्यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत प्रतिक्रिया देताना दगडू हलवाई म्हणाले, “होळी हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. गाठी-कंगन ही परंपरा केवळ व्यवसाय नाही, तर आमच्यासाठी एक सांस्कृतिक जबाबदारी आहे. आम्ही वर्षानुवर्षे ही परंपरा जपली असून दर्जेदार व स्वच्छ साहित्य ग्राहकांना देणे हेच आमचे ध्येय आहे. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम हेच आमचे खरे भांडवल आहे.”

इमरान भाई व वाजीद भाई यांच्या सहकार्याने मिलन हार कंगन सेंटर मार्फत ग्राहकांना योग्य दरात आणि वेळेत साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. होलसेल व्यापाऱ्यांसाठी विशेष सवलतीची व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.

यंदाच्या होळी सणातही गाठी-कंगनांची परंपरा अधिक उत्साहात साजरी व्हावी आणि प्रत्येक घरात गोडवा नांदावा, यासाठी दगडू हलवाई परिवार सज्ज झाला असून जामनेरकरांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार