छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आदर्श शिक्षण व क्रीडा बहुद्देशिय संस्था, देऊळपाट यांच्या वतीने शासनमान्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र व केंद्र शासन मान्यता प्राप्त या योजनेअंतर्गत सर्व समाजातील १८ ते ४५ वयोगटातील मुला-मुलींना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम के. लक्ष्मणराव भिमराव कोलते पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सावळदबारा (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे राबविण्यात येणार असून दिव्यांग उमेदवार तसेच विधवा व परितक्त्या महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
उपलब्ध डिप्लोमा कोर्सेस
मेक-अप आर्टिस्ट
सोलर पंप टेक्निशियन
गेस्ट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन (१० वी / १२ वी पास आवश्यक)
मल्टी-स्किल टेक्निशियन (होम अप्लायन्सेस)
अकाउंट एक्झिक्युटिव्ह (कॉम्प्युटर कोर्स)
प्रशिक्षण कालावधी ३ महिने असून, पूर्ण प्रशिक्षणानंतर शासनमान्य डिप्लोमा सर्टिफिकेट प्रदान करण्यात येईल. या सर्टिफिकेटच्या आधारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. तसेच शालेय शिक्षण साहित्य देखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुभवी शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
१) २ पासपोर्ट साईज फोटो
२) आधार कार्ड झेरॉक्स प्रत
३) १० वी / १२ वी मार्कशीट झेरॉक्स
४) १० वी / १२ वी टी.सी. झेरॉक्स
प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:सोनू सुधाकर पुजारी,शुभमं कानोहोरै 7517686536/7447584678
मोफत प्रशिक्षण, मोफत प्रवेश आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याने युवक-युवतींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने सोनू सुधाकर पुजारी,शुभंम कानोहोरे यांच्या कडून करण्यात आले आहे.अशी माहिती प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले






