छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वैजापूर /वेरूळ ता,०२

राज्यातील सेवा निवृत्ताना जी पेंशन मिळते ती  भीक नसून ती त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान होय ,तो पेन्शनर्सचा हक्क आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर  जिल्हा संघटना पेन्शनर्स अध्यक्ष व नाशिक विभागाचे

विभागीय पेन्शनर्स उपाध्यक्ष  द.मा.ठुबे यांनी वेरूळ येथील खुलताबाद तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या गुरुकुल विद्यालयात आयोजित  आनंद मेळाव्यात रविवार(ता,०१) मार्च रोजी  केले.अहिल्यानगरचे खा, निलेश लंके यांचे पिताश्री सेवा निवृत्त शिक्षक ज्ञानदेव लंके यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी ही संभाजीनगर जिल्ह्यातील उपस्थित पेन्शनर्स यांना संबोधित करीत पेन्शनर्सना केंद्र सरकारच्या सेवा निवृत्त कर्मचारी सारख्या सर्व  सुविधा सोयी मिळाव्यात ,राज्यातील जि.प.सेवा निवृत्त शिक्षक पेंशन  प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावी म्हणून शासनाकडे मागणी करणार असे विशद केले.पोपटराव इथापे व विलास जाधव यांनीही मार्गदर्शन केले. वसंत सबनीस आणि खुलताबाद संघटनेचे पद्माकर महाजन यांनी प्रास्ताविक केले.खुलताबाद पेन्शनर्स संघटनेच्या

अध्यक्षा मालनताई घोडके याना उत्कृष्ट  राज्य पेन्शनर्स   पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा आरंभ  साने गुरुजी यांची “खरा तो एकची धर्म- ही प्रार्थना वैजापूर पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी सादर केली. या प्रसंगी कन्नड पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष कुंभकर्ण,वैजापूर संघटनेचे अशोक आप्पा पवार खंडाळकर,तसेच खुलताबाद संघटनेचे रामभाऊ सोनवणे,मुक्ताबाई देवकर,लिलाबाई देवकर,श्रीखंडे–

ताई,मीना अंकुश,लता जानकर, दौडे सर व विशेष सहाय्य करणारे गुरुकुलचे निर्मलजी याशिवाय घुगे, याशिवाय घुगे, अमृतकर,देशमुख, परदेशी,सूर्यवंशी यांची उपस्थित होती.प्र.स.सोनकर,ठुबे गुरुजी,पारनेर चे राजाराम हुबे,महेश विटेकर,सूर्यवंशी यांनी ही सहभाग नोंदविला

धोंडीराम ठाकूर यांनी पसायदान सादर केल्या नंतर पद्माकर महाजन यांनी आभार मानले.

 

( पेन्शनर्स च्या अध्यक्ष मालन घोडके यांचा विशेष सत्कार करताना मान्यवर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार