लिंबगाव प्रतिनिधी श्रीपत पवार
लिंबगाव जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा पार पडला. . लिंबगाव तालुका पैठण दि.28(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार) येथील जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉक्टर सी व्ही रमण यांच्या संशोधन कार्याच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला तसेच एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक प्रबंधन मंत्रालय) परीक्षा 2026 च्या परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी गीता गजेंद्र निर्मळ हिची पैठण तालुक्यात एकूण 179 पैकी 136 गुण मिळवून पैठण तालुक्यात तुन प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचा शाळेच्या व गावकऱ्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी गावचे उपसरपंच वसंतराव पवार यांनी कुमारी गीता निर्मळ हिचे 1001रुपये देऊन सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक केकान सर व सर्व शिक्षक वृंदानी 501 रुपये देऊन गीता निर्मळ चा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश खिल्लारे सर यांनी केले याप्रसंगी उपसरपंच वसंतराव पवार, सोसायटी चेअरमन तुळशीराम पवार, हसेनपठाण,भगवान हिंगले, मदन निर्मळ बाबुराव पवार घृष्णेश्वर पवार गजेंद्र निर्मळ विनोद शरणागत दिलीप ससाणे मुख्याध्यापक केकान सर जिजा निर्मळ केदार सर कोल्हे सर सोनपिर सर अष्टीकर मॅडम तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते






