Home / Uncategorized / बीज प्रक्रिया केंद्र आहे की… प्रदूषण निर्मिती केंद्र…

बीज प्रक्रिया केंद्र आहे की… प्रदूषण निर्मिती केंद्र…

 

देऊळगाव राजा मुन्ना ठाकूर

शहराला प्रदूषणाचा विळखा.. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष… प्रक्रिया केंद्रावरील मजुरांचे आरोग्य धोक्यात! गजानन तिडके देऊळगाव राजा. पश्चिम विदर्भातील कापसाचे बाजारपेठ असलेल्या देऊळगाव राजा शहराचे नाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.येथील बाजारपेठेत विदर्भ -मराठवाडा आणि इतर ठिकाणाहून कापूस विक्रीसाठी येतो.त्यामुळे येथे नऊ ते दहा जिनिंग फॅक्टरी अस्तित्वात आहे परंतु सदर जिनिंग मध्ये रुई पासून सरकी अलग करताना जे प्लांट जिनिंग धारकांनी उभारले आहेत त्या ठिकाणी मात्र नियमांची पूर्णतः पायमल्ली होताना दिसत आहे. लोकमतने केलेल्या पाणीत सदर प्रकार उघडकीस आला. सविस्तर वृत्त: एकीकडे आपण औद्योगीकरणाची कास धरत असताना सोबतच प्रदूषण तसेच आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या जिनिंग फॅक्टर यापैकी आठ फॅक्टरी मालकांकडे बीज प्रक्रिया केंद्र( कापसाच्या रुई पासून सारखी अलग करणे ) अस्तित्वात आहे. सदर केंद्राला मान्यता देताना शासकीय अटीची पात्रता पूर्ण करूनच सदर केंद्राला मान्यता देण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने संबंधित प्रक्रिया करताना केमिकल युक्त पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. या पाण्याचा प्रक्रिया केंद्राच्या नियमानुसार सिमेंटच्या पक्के बांधकाम झालेल्या हौदामध्ये सोडावे असे प्रकर्षाने आदेशित आहेत. परंतु बहुतांशी जिनिंग मालकांनी तसे न करता खुल्या जागेमध्ये गड्डा खोदून त्यामध्ये सदर पाणी सोडलेले आहे. प्रत्येक जिनिंग मध्ये चार ते पाच गड्डे संबंधितांनी खोदले असून ते सद्यस्थितीत केमिकल युक्त पाण्याने भरलेले आढळले. काही तासात त्याच्यावर प्रक्रिया करून सदर केमिकल युक्त पाण्याची विल्हेवाट लावा असे आदेशात नमूद असताना सदर जिनिंग धारक त्याकडे कानाडोळा करून सदर पाणी हे खुल्या वातावरणात गड्ड्यामध्ये सासून ठेवल्या मध्ये सदर पाण्याचा निचरा जमिनीत होतो आणि तेच निचरा झालेले पाणी आजूबाजूच्या जमीन परिसरात तसेच विहिरीमध्ये निचरा स्वरूपात येते त्यामुळे सदर जमिनीची मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याने सदर पीक काढण्या योग्य राहत नाही म्हणजेच सदर जमीन बंजर स्वरूपाची होते साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन हवेमध्ये होत असताना हवेमध्ये त्याचे हवेच्या स्वरूपात मानवाला तसेच पाळीव प्राण्यांना सुद्धा धोका उद्भवत आहे. सदर विभागाने संबंधितावर कारवाई करून शहराला प्रदूषण मुक्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करताना दिसत आहे. *काय आहेत अटी मान्यता देताना* सदर बीज प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग प्लांट उभारताना सदरची जमीन ही अकृषक असावी, सदर कंपनी ची नोंदणी करताना मशिनरीचा तपशील, विशेष मध्ये केमिकल युक्त पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखडा, प्लांट सुरू करताना प्रदूषण मंडळासह स्थानिक इतर विभागाचे मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते. सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित प्लांट धारकावर गंभीर स्वरूपाची कारवाई प्रशासनातर्फे करण्यात येते. परंतु या ठिकाणी केमिकल युक्त पाण्यासाठी पक्के बांधकाम झालेले हौद बांधून त्या ठिकाणावरून सदर केमिकल युक्त पाण्याची विल्हेवाट लावावी असे आदेशात नमूद असताना. पक्के बांधकाम तर सोडा मातीच्या गड्ड्यामध्ये सदर पाणी घालून वातावरण प्रदूषण तसेच जमीन प्रदूषणात हे प्लांट धारक भर घालत असल्याने त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण होत आहे. *या भागात आहेत सदर प्रोसेसिंग प्लांट* देऊळगाव राजा हे कापसाची मोठी बाजारपेठ ही गौरवाची बाब असताना. प्रोसेसिंग प्लांट धारक सर्व नियमाची पायमल्ली करताना या ठिकाणी दिसत आहेत. सदर ठिकाणी उपस्थित मजूर काम करत असताना त्याच्या आरोग्याची काळजी ही तितकीच महत्त्वाची असते. परंतु कसलेही सुरक्षा सदर मजुरांना नसते. परिणामी सदर प्रदूषणामुळे त्या मजुरासह परिसरातील शहरातील नागरिकांना श्वसनाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रोसेसिंग प्लांट जालना रोड, शहराला लागून असलेले पिंपळनेर परिसर, गिरोली रोड, जाफराबाद रोड, अशा विविध ठिकाणी जिनिंग धारकांनी आपले प्लांट उभारलेले आहेत. परंतु सदर ठिकाणी कितपत सुरक्षा घेतले जाते याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. *प्रतिक्रिया*: काही ठिकाणी सदर प्लांट धारकांनी त्यांचे केमिकल युक्त पाणी व विभागाच्या जमिनीत सोडलेले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी जमीन ही बंजर झालेली असून त्या ठिकाणी काही ठिकाणात झाडाचे नुकसान सुद्धा झालेले आहे याची प्राथमिक पाहणी आम्ही करून वन कायदे अंतर्गत यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. उमेश गायकवाड वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा, *प्रतिक्रिया दोन* : प्रोसेसिंग प्लांट ( बीज प्रक्रिया केंद्र ) उभारताना सदर जिनिंग प्लांट धारकांनी आदेशित सर्व विभागांची परवानगी घेतलेली आहे काय याची प्रथमतः तपासणी करण्यात येईल. जर त्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झालेले असेल, तशा प्रकारचा अहवाल सदर मंडळाला पाठवण्यात येईल त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. वैशाली डोंगरजाळ – तहसीलदार देऊळगाव राजा. *प्रतिक्रिया क्रमांक3*) सदरच्या प्लांट धारकाकडून केमिकल युक्त पाणी हे वन विभागाच्या जागेमध्ये सोडण्यात आलेले आहे त्यामुळे सदरच्या केमिकलने वनविभागाची जमीन ही बंजर झालेली आहे. याकडे लेखी स्वरूपात संबंधित विभागाकडे अर्ज सुद्धा केलेले आहेत. परंतु वन विभागाने यामध्ये लक्ष घालून संबंधितावर कार्यवाही अद्याप पर्यंत केलेली नाही. सदरचे प्लांट हे नियमानुसार चालतात काय, सदर प्लांटची तपासणी किती महिन्यांनी होणे आवश्यक आहे हे तपासावे आणि शहराला प्रदूषण मुक्त करावे… गिरीश वाघमारे- समाजसेवक, *प्रतिक्रिया क्रमांक चार* : सदरच्या बीज प्रक्रिया केंद्र धारकांच्या केमिकल युक्त पाण्याचा निचरा हा जमिनीत झालेला असल्याचे शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत याची पाहणी करून वरिष्ठांना या संदर्भात अहवाल सादर करण्यात येईल. आणि संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. भगवान कच्छवे – तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार