छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
NAFED मार्फत हरभरा ५८७५ रु. शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी करावी – आकाश गायकवाड यांचे आवाहन

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात सध्या हरभऱ्याचे बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादासाहेब म्हस्के फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., सावळदबारा यांच्या माध्यमातून आकाश गायकवाड यांनी केले आहे.
NAFED अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजना २०२५-२६ राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सावळदबारा येथे नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
जाहीर हमीभाव पुढीलप्रमाणे :
हरभरा – रु. ५८७५ प्रति क्विंटल
तुर – रु. ८००० प्रति क्विंटल
बाजारात सध्या हरभऱ्याचे दर MSP पेक्षा कमी असल्याने शासन खरेदी हा शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरत आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार केवळ एफ.ए.क्यू. (FAQ) दर्जाचा शेतमालच खरेदी केला जाणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
७/१२ उतारा
८-अ पेरा नोंद (पिकाची नोंद असलेली)
बँक पासबुक झेरॉक्स
आधार कार्ड झेरॉक्स
जनधन खाते नसावे
मोबाईल क्रमांक (OTP साठी)
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून अंगठ्याचा ठसा (फिंगरप्रिंट) थंब मशीनद्वारे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रतिनिधीमार्फत नोंदणी होणार नाही, असेही स्पष्ट आकाश समाधान गायकवाड यांच्या कडून करण्यात आले आहे.
नोंदणी कार्यालय :
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सागर कृषी सेवा केंद्राजवळ, सावळदबारा
संपर्क : 8605427412 / 9049867116 / 9923449263
सध्या बाजारातील चढ-उतारामुळे शेतकरी संभ्रमात असले तरी शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घेऊन तोटा टाळावा, असे आवाहन आकाश गायकवाड यांनी केले आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.






