Home / Uncategorized / शेगाव, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’. 

शेगाव, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’. 

शेगांव

हा मेळावा २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान विसावा मैदान, विसावा भक्तनिवास संकुल, आनंद सागर रोड येथे पार पडत आहे.

मेळाव्याचे उद्घाटन माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. श्री. प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी उपचार सेवा, नेत्रतपासणी शिबिर, दिव्यांगांसाठी ADIP तपासणी व साहित्य वाटप, तसेच विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम व शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेण्यात येत आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा:

दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी 12:00 वाजता उदघाटन समारंभ माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

दिनांक 26/02/2026 रोजी दुपारी 12:00 वाजता घरचा वैद्य- आजीबाई चा बटवा घरगुती आयुर्वेदीक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच दुपारी 03:00 वाजता शेतकरी बांधवांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 27/02/2026 रोजी सकाळी 10:00 ते 04:00 वयोश्री व ADIP तपासणी व साहित्य वाटप शिबीर तसेच दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी.

दुपारी 04:00 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन.

दिनांक 28/02/2026 रोजी सकाळी 10:00 ते 03:00 मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबीर असे अनेकविध आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या अनुषंगाने मा. महामहिम राष्ट्रपती, मा. राज्यपाल, मा. केंद्रीय मंत्रिमहोदय, राज्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधि, केंद्र व राज्यसरकारचे अधिकारी, देशभरातूनयेनारे वैद्यकीय तज्ज्ञ या सर्वांचे आरोग्यविभाग बुलढाणा स्वागत करत आहे .

प्रशांत तांगडे, जिल्हा आयुष अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच आयुष वैद्यकीय व्यावसायिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार