Home / Uncategorized / वणवा लावणाऱ्याला दंड आणि खावी लागणार; संतोष दोडके वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा 

वणवा लावणाऱ्याला दंड आणि खावी लागणार; संतोष दोडके वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील व अजिंठा परिसरात सध्या उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणव्यांचे प्रमाण बाढते. वनक्षेत्रात निष्काळजीपणे आग प्रज्ज्वलित केल्यास, डोंगरालगत पेटती सिगारेट फेकल्यास भडकलेली आग हजारो हेक्टर वनसंपदा खाक करू शकते. आग लावून वनसंपत्तीचे नुकसान केल्यास होणारा दंड व सहा महिने ते एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. वनक्षेत्रात आग लावणाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याचे माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी बोलताना सांगितले आहे. आम्हाला आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवताला आग लावणाऱ्यांची अजिंठा वन विभाग खैर करणार नाही, जाळरेषाडोंगर व परिसरात हजारो हेक्टरवर फड्ढे जाळरेषा पाहून आग पसरू नये म्हणून उन्हाळा सुरू झाला की, वन मजुरांमार्फत जाळरेषा मारण्याचे काम दरवर्षी अजिंठा वनविभागाकडून केले जाते. जाळरेषा यासाठी महत्वाची वाळलेल्या गवताला चुकून आग ल ागल्यास ती पसरू नव्हे म्हणून जाळरेषा मारण्यात आलेल्या असतात. त्या आगीला रोखण्याचेच काम ती करते. पथक येईपर्यंत महत्त्वाचा दुवा जाळरेषा मानली जाते. आग लागल्यास वन्यजीव जैवविविधता नष्ट होते, अनेक वनस्पती जळून जातात. साप, ससे, तितर व इतर पक्ष्यांची अंडी, घरटी, पिलांची जळून राख होते. त्यामुळे वन विभागाकडून आगीला प्रामुख्याने रोखण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाने त्यांना आधुनिक साधनेही दिलेली असून, त्याचा उपयोग केला पाहिजे. वनक्षेत्र का महत्त्वाचे? पर्यावरण राखण्यासाठी वनक्षेत्रातील जैवविविधता जपणे गरजेचे असून, ऑक्सिजन ही महत्वाची निर्मिती वनक्षेत्रातूनच तुम्हाला मिळते. त्यामुळे आरोग्य आणि जैवविविधता टिकवण्याचे काम संपदा वनक्षेत्र करत असते. जंगलाला पडते आग लागण्याची प्रमुख कारणे निसर्ग भ्रमंती करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी तसेच ज्वलनशील कोणत्याही वस्तू सोबत घेऊन जाऊ नये, अशा विविध सूचना दिल्या जातात. वनक्षेत्रातून अनेक रस्ते गेलेले असून, सिगारेट, बिडी टाकल्याने किंवा ज्वलनशील वस्तू वापरण्यानेही वन आगीच्या भक्ष्यस्थानी जंगलातील लाकडे पळविणे किंवा वन्यजीवांची शिकारही असू शकते. वणवा लावणाऱ्यास कारावासाची तरतूद वणवा लावणाऱ्या दंड व जेलची खावी लागणार हवा असून अजिंठा वनविभागाकडून तशी तयारीही करण्यात आलेली आहे.

वणवा लावणाऱ्यास व लाकुड तोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार!

‘सावळदबारा परिसरात व गिरडा घाटात सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना… आगीमुळे अजिंठा वनक्षेत्राचे नुकसान होऊ नये म्हणून सवींना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनावरे चारणारे, लाकूड तोडणारे व लपूनछपून पार्टी करणारे संशयारपद दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

संतोष दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा ता सिलोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार