Home / Uncategorized / डॉ. संतोजी रामजी लाड जयंतीनिमित्त सावळदबारा येथे नियोजन बैठक…

डॉ. संतोजी रामजी लाड जयंतीनिमित्त सावळदबारा येथे नियोजन बैठक…

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

शांततेत व साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा एकमताने निर्णय शांताराम खराटे यांची माहिती

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज बांधव, सावळदबारा यांच्या वतीने ४ मार्च रोजी डॉ. संतोजी रामजी लाड यांच्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक उत्साहात पार पडली. समाजातील एकोपा व सामाजिक सलोखा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत जयंती कार्यक्रम शांततेत व साध्या पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी जयंती कार्यक्रमात समाजहिताचा संदेश देणारे उपक्रम राबवावेत, अनावश्यक खर्च टाळावा आणि सामाजिक ऐक्याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना केली. डॉ. लाड यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून समाजातील युवकांनी संघटित राहून सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी शांताराम भाऊ खराटे, भोकरे सर, किसन रावळकर, भिवसन रावळकर, विजय रावळकर, संजय रावळकर, विलास रावळकर, राजू खराटे, दगडू खराटे, किशोर रावळकर, पंजाबराव रावळकर, मयूर रावळकर, रमेश खराटे, शंकर खराटे, तुकाराम खराटे, सुभाष खराटे, गणेश खराटे, अक्षय खराटे, सुनील माकोडे, राहुल खेडकर, राजू खेडकर, भगवान माकोडे, काशीराम खराटे, अमोल रावळकर, भगवान रावळकर, सुदाम खराटे व सागर रावळकर यांच्यासह खाटीक समाजातील बांधव व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सोयगाव तालुका अध्यक्ष तथा अनुसूचित जाती-जमाती मोर्चा अध्यक्ष शांताराम खराटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. समाजातील ऐक्य, शिस्त आणि शांततेच्या भूमिकेमुळे जयंती कार्यक्रम आदर्श पद्धतीने पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार