Home / Uncategorized / शिवाजी विद्यालय सावळदबारा दहावी निकालात चमकले; ९९ टक्के निकालासह मुलींची दमदार बाजी..!

शिवाजी विद्यालय सावळदबारा दहावी निकालात चमकले; ९९ टक्के निकालासह मुलींची दमदार बाजी..!

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

अनुराधा कोते व वैष्णवी वखरे संयुक्त प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव…

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील शिवाजी विद्यालयाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी सन-२०२६ च्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत ९९ टक्के निकालाची भव्य कामगिरी छत्रपती शिवाजी विद्यालयाने नोंदविली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात नांदा तांडा, मोलखेडा, हिवरी, चारु तांडा, टिटवी पळसखेडा, नादांगाव, तोरनाळा, देवळगाव गुजरी, फत्तेपूर, जामनेर,फर्दापूर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि. ९ /५/२०२६ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे गुणवत्तेची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात मुलींनी आपला ठसा उमटविला. विशेष म्हणजे २०२६ यंदाच्या निकालात मुलींनी दमदार बाजी मारत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.

विद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा गजानन कोते व वैष्णवी ज्ञानेश्वर वखरे यांनी प्रत्येकी ९३.२० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तर कोमल प्रवीण लोखंडे हिने ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. आरती अनिल सुरडकर व श्रद्धा एकनाथ दांडगे यांनी प्रत्येकी ९१.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर झेप घेतली. तसेच साधना जैयस्वाल हिने ९०.६० टक्के तर प्रथमेश दीपक सूर्यवंशी याने ८९.६० टक्के गुण संपादन करून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे पालक, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम, प्राचार्य एन आर कोलते पाटील व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना अमोल कोलते पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एन. आर. कोलते पाटील, संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, सचिव सौ. रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील, प्रा. जीवन कोलते पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे परिसरात शिक्षणाबाबत विश्वास अधिक दृढ झाला असून आगामी काळातही विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करून छत्रपती शिवाजी विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा भावी प्राचार्य प्रा. जीवन कोलते पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच विकास पाटील, विजयसिंह राजपूत, भास्कर सासणे, भास्कर खमाट, मुकुंदा व्यवहारे, सुदाम राठोड, भूषण देसले, पोपटराव सोनवणे, ज्ञानेश्वर राठोड, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, राहुल ब. डक, गजानन चव्हाण, संदीप कोलते , बाबासाहेब कोलते, तसेच उपसंपादक गोकुळसिंग राजपूत व आदी मान्यवरांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार